Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत राज्यातील पहिल्या दिव्यांगाच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन दिव्यांगासाठी अहोरात्र कार्य करणार डॉ.संतोष मुंडे

  



दिव्यांगासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार: बाबुराव रुपनर ना. तहसीलदार 

आपला ई पेपर/ परळी /प्रतिनिधी

जिल्यातीलच न्हवे तर राज्यातील पहिल्या दिव्यांगाच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन दिव्यांग मंत्रालय उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या शुभहस्ते अतिशय उत्साहात संपन्न झाले.

राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालक मंत्री  ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या या शिवभोजण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी परळीचे ना. तहसीलदार बाबुराव रुपनर,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके, मा. उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण, डॉ.प्रवीण खाडे, मनसेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, नाभिक समाजाचे नेते सुरेंद्र कावरे, नगरसेवक शेख शम्मु, अखिल भारतीय वारकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे ,डिजिटल मीडियाचे परिषदेचे तालुका अध्यक्ष नितीन ढाकणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेंद्र कावरे यांनी केले, राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे सतत दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवत असतात आणि दिव्यांगासाठी घेतलेला सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा वसा ते अविरत जपत राहणारे नेतृत्व म्हणून सर्व जण डॉ.संतोष मुंडे यांना पाहतात,  

आजपर्यंत दिव्यांगांसाठी अहोरात्र कार्य करतोय आणि करत राहणार, असे उद्गार डॉ संतोष मुंडे यांनी काढले तसेच सय्यद सुभान यांनी सुरू केलेल्या मराठवाडा शिवभोजन केंद्रास त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि शिवभोजन केंद्रास असणारा शासनाचा कोटा वाढून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असा शब्दही दिला.

सय्यद सुभान यांची कार्य करण्याची तळमळ आणि परिश्रम पाहूनच त्यांना केंद्र सुरु करण्यास सहकार्य केले असे परळीचे ना.तहसीलदार बाबुराव रुपनर आपल्या मनोगतातून म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके, मनसेचे श्रीकांत पाथरकर,यांचीही भाषणे झाली,

कार्यक्रमास जुबेर बाबा ,सय्यद सकावत सर, सय्यद आबेद, संतोष आघाव ,विठ्ठल साखरे, विष्णू आघाव, सय्यद असेफ ,इमरान शेख ,सय्यद अश्फाक आदीसह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या