Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने बालविवाह जनजागृती

 

आपला ई पेपर|परळी प्रतिनिधी


येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने पांगरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात दररोज योगासने, ग्रामस्वच्छता करण्यात येत असून गुरुवारी (दि.०१) गावातून बालविवाह जनजागरण रँली काढण्यात आली.यावेळी विद्यार्थी व गावकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर बालविवाह संदर्भात शपथ देण्यात आली.

पांगरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवती शिबीरात गुरुवारी पांगरी येथे सकाळी गावातून बालविवाह संदर्भात जनजागरण रँली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही बालविवाह करणार नाही, करु देणार नाही अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना बालविवाह प्रतिबंधक शपथ देण्यात आली. तसेच ग्रामस्वच्छतासह मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. गावकऱ्यांना झाडे लावा, झाडांचे संवर्धन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना दिला. 

शिबीरात विद्यार्थ्यांसह वरिष्ठ विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विनोद जगतकर, प्रा डॉ राजर्षी कल्याणकर, प्रा डॉ प्रविण दिग्रसकर, कनिष्ठ विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा प्रविण फुटके, प्रा विणा भांगे, प्रा विशाल पौळ, डॉ रंजना शहाणे, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या