Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 आपला ई पेपर परळी प्रतिनिधी


लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, प्रा डॉ विनोद जगतकर, प्रा डॉ प्रविण दिग्रसकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



  

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. विनोद जगतकर यांनी सांगितले की, महापुरुष स्वतः साठी जगत नाहीत, ते देशासाठी, देशातील नागरीकांसाठी काहीतरी अद्वितीय काम करतात म्हणून ते महापुरुष बनतात. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली यामुळे देश प्रगतीपथावर आला आहे. 

तर संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख यांनी सांगितले की, महापुरुषांनी दाखवलेला मार्ग विद्यार्थ्यांनी अंगीकृत केला पाहिजे तरच महापुरुषांची जयंती साजरी करण्याचे सार्थक आहे. तर अध्यक्षीय समारोप प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांनी सांगितले की, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामराव देशमुख हे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचे पाईक होते. 

त्यांनी शहरात मुलीसाठी महाविद्यालय सुरू केले फक्त सुरू केले नाहीतर तर त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्रविण फुटके यांनी, सुत्रसंचालन विद्यार्थिनी संध्या सातपुते तर आभार प्रा.डॉ प्रविण दिग्रसकर यांनी केले.

 यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या