Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लिंबुटा गावच्या जल जीवन मिशन अंतर्गत कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेचे फुलचंद कराड यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

 आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 

परळी तालुक्यातील लिंबुटा गाव म्हणजे माझे ह्रदय असुन या गावच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आणत गावातील प्रत्येक ग्रामस्थाचा विकास करण्याचे आपले ध्येय असुन लिंबुटा गावच्या विकासासाठी मी कधीच निधी कमी पडु देणार नसल्याचा विश्वास भगवान सेनेचे सेनापती तथा भाजपा जेष्ठ नेते फुलचंद कराड यांनी व्यक्त केला.फुलचंद कराड यांच्या हस्ते लिंबुटा गाव आणि लिंबुटा तांडा येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन वेळी ते बोलत होते.

  पुरग्रस्ताचे 100 टक्के पुनर्वसन असलेले गाव म्हणुन महाराष्ट्रात ओळखल्या जाणार्या लिंबुटा गावची ग्रामपंचायत भगवान सेनेचे सेनापती तथा जेष्ठ नेते फुलचंद कराड यांच्या ताब्यात काही अपवाद वगळता 45 वर्षांपासुन ताब्यात आहे. त्यापैकी 6 वेळा भाऊंना बिनविरोध गावकऱ्यांनी ताब्यात दिली आहे.

 तसेच देश स्वतंत्र झाल्या पासून गावाला पाण्याची व्यवस्था नव्हती आता ती भाऊंनी कायमस्वरूपी उपलब्ध करून दिली आहे.कराड यांच्या प्रयत्नातून या गावासाठी जलजीवन मिशन योजनेतुन पाणीपुरवठा योजना मंजुर झाल्यानंतर बुधवार दि.20 डिसेंबर रोजी गावातील हनुमान मंदिर व नागापूर वाणधरण येथे भगवान सेनेचे सरसेनापती, भाजपा जेष्ठ नेते फुलचंदभाऊ कराड यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले. तसेच लिंबूटातांडा येथे पाण्याच्या टाकीचे व तांडा अंतर्गत पाईप लाईनचे उद्घाटन झाले.

त्या नंतर लिंबुटा गावातली पाईप लाइनचे व पाण्याचे टाकीचे उद्घाटन 101 नारळ फोडून करण्यात आहे व हनुमान मंदिर वर जाहीर कार्यक्रम झाला. आपल्या भाषणातून भाऊंनी गावाची ग्रामपंचायत आल्या पासूनचे कामे केलेले सांगितले 33 kv लाईन शिफ्ट केलेली व इतर कामाचा पाडा वाचला. तसेच समस्थ गावकरी मंडळीनी भाऊंचा पाणी पुरवठा योजना मंजूर केला बद्दल सत्कार केला.यावेळी उपस्थित लिंबुटा ग्रा.प.सरपंच सौ. दैवशाला सुधाकर बनसोडे, उपसरपंच अरुण मुंडे,से.स.सो व्हाईस चेअरमन रमेश कराड,माजी सरपंच सुदामआप्पा मुंडे,महादेव कराड,ग्रा.सदस्य,रवी कराड, इंद्रमोहन मुंडे,संभाजी सोळंके,प्रदीप आंधळे,विश्वनाथ मुंडे,जयराम मुंडे,विश्वनाथ मुंडे, सिध्दार्थ बनसोडे,प्रकाश राठोड, रमेश चव्हाण,बाबुराव मुंडे,प्रशांत कराड,मंचक मुंडे,विनोद मुंडे, मुक्तराम कराड,बाबुराव राठोड,महादेव मुंडे,हनुमंत दिवटे, बाबुराव कराड,सोपान कराड, सुभाष कराड,मनोज मुंडे,सोमनाथ कराड,बाळासाहेब कराड,विश्वंभर दोडके,रामप्रभू कराड,नारायण दिवटे,अच्युत कराड,हनुमंत फड, गोविंद मुंडे,जनार्धन कराड,विठ्ठल मुंडे,रगुनाथ कराड,वैजनाथ कराड,संतोष कराड,रोहन मुंडे, शिवाजी मुंडे,बळीराम मुंडे,सुधाकर बनसोडे,नितीन बदने,सहदेव कराड,विजय कराड,राम कराड,विनोद बनसोडे,सुंदर दिवटे, रामधन मुंडे,नितीन कराड,खुशाल कांबळे,जगन्नाथ मुंडे,संदीप कराड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या