Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पाचवे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ देवस्थानचे दर्शन न करता गेल्यास तर गोदावरी परिक्रमा अर्धवटच होते

आपला ई पेपर परळी वैजनाथ

महंत तथा मंगल पिठाधिश्वर माध्वाचार्य यांचा वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार

नासिक येथून सुरु झालेल्या गोदावारी परिक्रमा साठी परळीत वैष्णव सांप्रदायतील प्रमुख महंत तथा मंगल पिठाधिश्वर माध्वाचार्य (मुंबई) यांच्या सह चित्रकूट, जगन्नाथपुरी, आयोध्या, मथुरा, भुवनेश्वर, नासिक, काशी, राजस्थान, हरियाणा येथील शंभरावर अधिक साधु,संत,महंत व दोनशे पेक्षा अधिक शिष्य मंडळीनां सोबत घेत गोदावरी परिक्रमा निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगा पैकी पाचव्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन व्हावे तसेच भगवान विष्णूचे आवतार राम, कृष्ण हे भगवान शंकराचे अनन्य भक्त होते हा परमार्थातील धागा पकडत वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी आले होते

नासिक येथून सुरु असलेली परिक्रमा पाच राज्यातून व केंद्र शासित प्रदेश पांडेचरी, काकिनाडा येथे गोदावरी नदीस वळसा मारून परत नासिक येथे निघाली आहे

नर्मदा परिक्रमा पेक्षा ही अवघड असलेल्या गोदावरी परिक्रमास शास्त्रात महत्व आहे, परळी हे गोदावरी नदी काठी जरी वसलेले नसले तरी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ देवस्थानचे दर्शन न करता आपण गोदावरी परिक्रमा केल्यास अर्धवटच पुण्य भक्तांच्या पदरी पडेल म्हणून परळी या पुण्यभूमीस यावेच लागले असे ही महंत तथा मंगल पिठाधिश्वर माध्वाचार्य यांनी सांगितले

यावेळी त्यांनी त्यांच्या सोबत आलेल्या अनेक साधु संत व भक्त मंडळी यांनी वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेतले तदनंतर वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्रा. बाबासर देशमुख यांनी मंगल पिठाधिश्वर माध्वाचार्य यांचा सत्कार केला


*अपघात |अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू*
🔴👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/12/blog-post_38.html*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात साजरी*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/12/blog-post_22.html*

*स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून धनंजय मुंडे यांनी केले अभिवादन*
🔴👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/12/blog-post_12.html*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या