Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

रेल्वे प्रवासी महिलेचे अड.जीवन देशमुख यांनी वाचविले प्राण


रेल्वेत आडकुन झाली जखमी, उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

आपला ई पेपर परळी वैजनाथ प्रतिनिधी

रेल्वेतून उतरताना डब्याच्या मोकळ्या जागेत पाय गेल्याने अडकलेल्या महिलेची प्रसंगावधान राखून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. जीवन देशमुख यांनी सूटका केली आणि तिचे प्राण वाचवले. ही घटना आज मंगळवारी रात्री 9 वाजण्याचे सुमारास घडली. जखमी झालेल्या महिलेला रेल्वे पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान अॅड. देशमुख यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

      याचे झाले असे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. जीवन देशमुख देशमुख हे आज मंगळवार दि. 19 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याचे सुमारास त्यांच्या मुलाला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले होते. नांदेड - पनवेल ही रेल्वे गाडी स्टेशनवर आली. याचवेळी एक प्रवाशी महिला रेल्वेतून उतरत असताना तोल जाऊन त्यांचा पाय रेल्वेखाली अडकला. त्यांनी मदतीसाठी धावाधाव केली, नागरिक जमाही झाले. हा प्रकार पाहुन अॅड. जीवन देशमुख यांनी तातडीने रेल्वे पोलिसांना बोलावून घेऊन त्यांच्या मदतीने महिलेला बाजुला घेतले. महिलेच्या पायाला मार लागलेला असल्याने आणि रक्तस्राव होत असल्याने तातडीने महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर महिलेला अंबाजोगाई येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

     दरम्यान अॅड. जीवन देशमुख यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचे प्राण वाचले असल्याचे सहप्रवाशांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या