Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात |अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू


हा रस्ता धोकादायक बनला आहे.. त्या गुत्तेदारावर गुन्हा दाखल करावा ?

आपला ई पेपर © माजलगाव 

खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील माजलगाव- तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेंगामध्ये मोटरसायकलचे चाक अडकल्याने अपघात झाला. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

अब्दुल हाफिज सत्तार खान वय 49वर्ष असे त्यांचे नाव आहे. मंगळवार दि.12 डिसेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. खामगाव – पंढरपूर या महामार्गावर दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. या भेगांमध्ये मोटरसायकलचे चाक अडकून अपघाताच्या घटना सतत घडत आहेत. आज (मंगळवारी) पंचायत समिती पतसंस्थेचे कर्मचारी खान हे कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर आपल्या घरी सिरसाळा येथे निघाले होते. 

माजलगाव – तेलगाव रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपा समोर आले असता त्यांच्या मोटारसायकल एम.एच.38 ए 7218 चे चाक रस्त्यावरील भेगांमध्ये अडकले व मोटरसायकल जागेवरच पलटी झाली. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरील रस्ता सुरुवातीपासूनच धोकादायक बनला आहे.त्यामुळे त्या गुत्तेदारावर गुन्हा दाखल करावा अशी चर्चा सुरू आहे.

 दरम्यान या वेळी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा या रस्त्यावरून जात असताना त्यांनी ताफा थांबवला व अपघाताची माहिती घेतली. त्यांनीच रुग्णवाहिकेला फोन करून मदतीसाठी प्रयत्न केले. त्यांनतर अब्दुल हाफिज सत्तार खान यांचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या