Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

१८० देशात,गीता जयंतीनिमित्त होणार अविरत ४२ तास अखंड गीता पठण परळीतही होणार सामूहिक गीता पठण

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी



 दि.२२ - गीता जयंती निमित्त सामुहिक पाठचे आयोजन करण्यात येणार आहे. दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता विद्यावर्धिनी शाळेत १३ व १५ व्या  अध्यायाचे सर्व विद्यार्थ्यांकडून सामुहिक पाठ होणार आहे.तसेच दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता भेल सेकंडरी  स्कूल येथे विद्यार्थ्यांकडून सामुहिक पठन केले जाणार आहे.दि.२२ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत हनुमान मंदिर मोंढा येथे गीतेचे संपुर्ण १८ अध्याय याचे सामुहिक पठन केले जाणार आहे. श्रीराममंदिर जन्मभूमीचे कोषाध्यक्ष व गीता परिवाराचे संस्थापक प.पू. स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराजांद्वारे ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.

परळी येथील सर्व गीताप्रेमींनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन उन्मेष मातेकर,ज्ञानेश्वर चिक्षे,मुख्याध्यापक ठाकूर सर,गोहिल मॅडम व गीता परिवाराच्या श्वेता काबरा, ललिता जाजू, सुजाता मुंदडा, सुनीता बंग, राजकन्या मंत्री अर्चना इंदानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.गीता जयंती निमित्त जगभरात गीता परिवाराच्या सामूहिक गीता पठणाचे आयोजन केले गेले आहे.यासाठी जगभरात १८० देशांतून एक लाख गीताप्रेमींद्वारे अविरत ४२ तास ऑनलाईन अखंड अष्टादश गीता पारायण केले जाणार असून ज्यामध्ये श्रीमद्भगवद्गीतेच्या १८ अध्यायांचे १८ वेळा शुद्ध संस्कृत पारायण केले जाणार आहे.

श्रीमद्भगवद्गीतेचे प्राकट्य मोक्षदा एकादशीच्या दिवाशी सुमारे ५१६० वर्षांपूर्वी झाले होते. ह्या वर्षी मोक्षदा एकादशी २२-२३ डिसेंबरला आहे.ह्या पावन प्रसंगी गीता परिवाराद्वारे शनिवार २३ डिसेंबर सकाळी ६ वाजल्यापासून ते रविवार, २४  डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत गीतेच्या संपूर्ण १८ अध्यायांचे १८ वेळा अखंड पारायण ऑनलाईन झूम ॲपवर होणार आहे. १८० देशांतील  हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगु, ओडिआ, नेपाळी, आसामी, मल्याळम, सिंधी भाषांमध्ये स्वतःच्या सोयीनुसार ह्या पारायणात  Learngeeta.com आणि गीता परिवाराचे यूट्यूब चॅनल Geeta Pariwar च्या माध्यमाने लाईव्ह सामील होता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या