Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईत दत्त जयंती नवरात्र महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम

 आपला ई पेपर अंबाजोगाई प्रतिनिधी 


अनेक वर्षाची परंपरा लाभलेला तसेच सांस्कृतिक व कलात्मक दृष्टीने महत्वपुर्ण व असलेला दत्त जयंती मार्गशिर्ष नवरात्र महोत्सव १९ ते २७ डिसेंबर या कालावधीत दत्त संस्थान थोरले व धाकटे देवघर येथे संपन्न होत असून यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दत्तजयंती नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने पत्रकार राहुल देशपांडे यांनी दिली. दत्तजयंती नवरात्र महोत्सवानिमित्त दत्त संस्थान (मंदीर) थोरले देवघर येथे संस्थानधिपती समीर गोस्वामी यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी अभिषेक,मंत्र अनुष्ठान,वेदोक्त श्लोक, स्त्रोत्र,अष्टक,जयंती, महानिरांजन,प्रदक्षिणा,दासोपंत रचित भजन, किर्तन आदी कार्यक्रम होतील.

१९ ते २४डिसेंबर या कालावधीत


रात्रो नृत्य,गायन,किर्तन दि.२१ ते २४ डिसेंबर रोजी दुपारी धार्मिक कार्यक्रम २२ डिसेंबर रोजी रात्री उशिरा मंदीर परिसरात पालखी २३ व २४ डिसेंबर रोजी सायंकाळी व रात्री उशिरा मंदिर परिसरात पालखी २५ डिसेंबर रोजी दुपारी गायन आणि सायंकाळी गुरूपुजन व अवतारोत्सव सोहळा २६ डिसेंबर रोजी प्रातःसमयी भजन व पालखी सोहळा तसेच दत्तजयंती निमित्ताने धार्मिक कार्यक्रम व दत्त सहस्त्रनाम,षोडशोवतार हवन (होम) होवुन पुर्णाहुतीचा कार्यक्रम होईल. दि.२७ डिसेंबर रोजी प्रातःसमयी भजन,पालखी सोहळा त्यानंतर लळीत लोककला सादरीकरणाने दत्तजयंती महोत्सवाचा समारोप होईल.या सर्व कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या