Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

चक्क अज्ञातांनी पोलिसांचे नाव पुढे करत,फोन करून परळीतील व्यापाऱ्यांना लुटण्याचा नवीन फंडा

आपला ई पेपर|परळी प्रतिनिधी


 मी परळी पोलीस ठाण्यातून पिएसआय बोलतोय असा फोन करून ऑनलाइन पैसे टाका असे म्हणत परळीतील दोघा व्यापाऱ्याला फसवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाइन पैशाची मागणी करून गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळखळ माजली आहे. परंतु सदरील प्रकार हा परळी शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे 

उधळण्यात यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी येथील शुभम रेडीमेड चे आकाश सुत्रावे यांना मी परळी शहर पोलीस ठाण्यातून पीएसआय पाटील बोलतोय. तुम्ही कुठे आहेत. दुकानात आहेत का ? डिपार्टमेंटच्या दांडगे मॅडमला सहा हजार आठशे रुपये फोनपेद्वारे पाठवा. मॅडम आपणाला कॅश देतील. ऑनलाईन पैशाची आवश्यकता आहे. असे म्हणत फसवण्याचा प्रकार आहे. 

सदरील व्यापाऱ्यांनी पोलीसाची संपर्क साधला त्यामुळे पुढील अनर्थ टाळला आहे. तसेच दुसऱ्या एका घटनेत परळी पोलीस स्टेशन मधून पीएसआय प्रीतम कांबळे बोलतोय असे म्हणत निलेश काटकर व्यापाऱ्यास दीडशे बॅग घेऊन पोलीस ठाण्याकडे या. असे म्हणाला नंतर संबंधित व्यापारी पोलीस स्टेशन कडे बॅग घेऊन गेल्यानंतर सदरील व्यापाऱ्याने फोन केला असता त्याला वैद्यनाथ मंदिरकडे या...परंतु परळीतील व्यापाऱ्यांना लुटण्याचा नवीन फंडा अगोदर पन्नास रुपये पाठवा नंतर तुम्हाला दीडशे बॅगचे पैसे मी तात्काळ देतो. असे म्हणत गंडवण्याचा प्रकार केला आहे. सदरील प्रकार परळी शहर पोलीस ठाण्याचे पो. कॉ. दत्ता गिते व पो.कॉ रामकिशन रेडेवार यांना सदरील व्यापाऱ्यांनी सांगितला. दरम्यान व्यापार्याला आलेल्या या नंबर वरती फोन करून पोलिसांनी शहानिशा केली असता सदरील फोन करणारे तोतया असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्री गतिमान करीत तपास केला

असता संबंधित व्यक्ती हे परप्रांतीय असल्याचे समजते.

परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. जमादार दत्ता गिते व पो. कॉ रामकिश रेडेवार यांनी झालेल्या प्रकाराबद्दल तात्काळ शहानिशा केली व व्यापाऱ्यांना मदत केली.

ऑनलाइन व्यवहार करताना शहानिशा करावी..

दरम्यान अशा प्रकारे कोणी ऑनलाईन पैशाची मागणी करीत असेल तर त्याची शहानिशा करावी किंवा पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन परळी पोलिसांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.


*शासन ई शिधापत्रिका देणार रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिकाबाबत मोठा निर्णय*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/12/blog-post_84.html*

*पंकजाताईंचा सेवा संकल्प ; काय आहे*. *#Video_News*
🔴👇👇👇👇
*https://youtu.be/EPOH8dHkzHQ?feature=shared*

*Breaking News|
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या