Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती प्रित्यर्थ...

आपला ई पेपर प्रतिनिधी परळी 

 भेल संस्कार केंद्रात अभिनव दिनदर्शिका 2024 चे उत्साहात अनावरण  

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजकारणाच्या पटलावर बोटावर मोजण्याइतकेच  राजकारणी धुरंधर आहेत, ज्यांनी आपापल्या हयातीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून भारताच्या राजकारणात आपली छाप उमटवली आहे. या धुरंधर मंडळींमध्ये मा. श्री. प्रमोदजी महाजन,

श्री.अटलबिहारी वाजपेयी, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, श्री. शरदचंद्रजी पवार, भारताचे विद्यमान, लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी इ. महानुभवांच्या रांगेतील अगदी सन्मानाने घेतले जाणारे नाव म्हणजेच मराठवाड्याचे सुपुत्र  लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब होय.ही सर्व नावे तिसऱ्या जगातील असून यांना राजकारणाचा कोणताही वसा/वारसा लाभलेला नसतानाही स्वतःच्या कर्तुत्वावर यशाची अनेक शिखरे त्यांनी सर करून आपापल्या काळावर आपला चिरकाल ठसा उमटविला आहे. साहेबांच्या वाट्याला तर अत्यंत खडतर जीवन संघर्ष आला, परंतु मुंडे साहेब जीवनभर कुठेही न थकता आपला संघर्ष करत राहिले आणि इतिहासाच्या पानांवर त्यांचा अजोड संघर्ष अजरामर राहिला.

            या कार्यक्रमास प्रमुख अतिथी आदरणीय श्री.हिम्मतराव अवचार(  अभियंता ,महाजनको परळी) तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. नयनकुमार आचार्य (वैद्यनाथ महाविद्यालय, परळी ) यांनी भूषविले. सर्वप्रथम अद्वितीय लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना प्रा. आचार्य सर म्हणतात की, "आईच्या कुशीत हिरवाईचे स्वप्न फुलवणाऱ्या, शेतकऱ्यांचे कैवारी, उभ्या महाराष्ट्राचे दैवत, लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचा हा जयंती उत्सव भेल संस्कार केंद्रात आयोजित करण्यात आला. ज्याप्रमाणे एखादी नदी डोंगरातून उगम पावते व ती पुढे विस्तारते आणि सागरास मिळते पण जाता जाता लाखो लोकांचे जीवन सुखी करून जाते, त्याचप्रमाणे साहेबांचा *नाथरा ते दिल्ली* प्रवास म्हणजे विकासाची चळवळ होती. जी लोकसेवेला समर्पित होते. याचे द्योतक म्हणून भेल संकुलामध्ये *वक्तृत्व स्पर्धा आणि  *'भव्य चित्रकला स्पर्धेचे'* आयोजन करण्यात आले होते.  


वक्तृत्व स्पर्धा

           

या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे:

इयत्ता-सहावी

1) कु.सई सचिन जाधव 

2) कु.वैष्णवी सिताराम  आघाव

3) कु.मधुरा सोमेश्वर मुंडे


 इयत्ता- सातवी / आठवी

1) चि.शर्विल संदीप कुंदे

2) कु.श्रावणी शितलकुमार गायकवाड 

3) कु.आकांक्षा महिपाल  सावंत


इयत्ता-नववी / दहावी

1) चि.सच्चिदानंद चंद्रकांत चाटे

2) कु.इशिता अशोक धायगुडे

3) चि. यश अविनाश जाधव. इ.


*चित्रकला स्पर्धा*

              या स्पर्धेतील विजेत्या चित्रकारांचे एकूण 24 चित्रांची निवड ही दरवर्षीप्रमाणे *'अभिनव दिनदर्शिका 2024'* करिता परीक्षकांच्या मदतीने  करून त्यांची कलाकृती / कलाकुसर प्रकाशित करण्यात आले. हे संपूर्ण कार्य श्री. डॉ. सतीशजी रायते सर, श्री. तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलातील चित्रकला शिक्षक श्री. श्रीकांत मुलगीर सर यांनी समर्थपणे पुर्ण केले. या कार्यात परीक्षक म्हणून त्यांना श्री. चव्हाण सर (वैद्यनाथ विद्यालय, परळी वै) व श्री. साखरे सर (वैद्यनाथ विद्यालय, परळी वै) यांनी खूप मोलाचे सहकार्य केले." दिनदर्शिका 2024" चे अनावरण प्रसंगी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांकडून रोख रक्कम, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा पालकासमवेत मान्यवरांकडून यथोचित गौरव करण्यात आला. या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे आहेत- चि. आयुष दीपक फड (दुसरी गोदावरी) चि. शौर्य धर्मराज फुलझेले (तिसरी गंगा) कु. श्रावणी अण्णासाहेब फड (तिसरी गोदावरी) कु. मानसी गोपाल फड (चौथी गोदावरी), कु. अवनी भास्कर हिंगवार (पाचवी गंगा) कु. सान्वी महादेव गुट्टे (चौथी यमुना), कु. सान्वी संतोष मिसाळ (दुसरी गोदावरी) कु. जान्हवी कैलास लाहोटी (चौथी गोदावरी), चि. शिवम विलासराव घुगे (सातवी विंध्या), कु. खुशी श्यामसुंदर दोडिया (सहावी विंदया), चि. मेघराज प्रदीप कराड( सातवी स्टेट )कु. राजनंदिनी राजेभाऊ गडदे (पाचवी गोदावरी), कु. ऋतू तुकाराम गीत्ते (सातवी हिमालय) कु. सानवी पंकज अवचार (पाचवी यमुना) कु. सई सचिन जाधव (सहावी सह्याद्री) चि. वैभव सुशील हरंगुळे (पाचवी गोदावरी) कु. सेजल प्रणव मोदानी (दहावी हिमालय) कु. प्रज्ञा प्रभाकर वाघमारे (नववी स्टेट) कु. अंजली विशाल गीते (दहावी हिमालया) कु. अक्षरा सचिन मुंदडा (नववी हिमालया) कु. श्रद्धा संजय फुलझळके (नववी हिमालया), कु. जीविका भारत गायकवाड (दहावी स्टेट) कु. श्रावणी लक्ष्मण साठे (नववी स्टेट) चि. शर्विल संदीप कुंदे (आठवी सह्याद्री) इ. आहेत.   

याप्रसंगी व्यासपीठावर  मा.श्री.वसंतराव  देशमुख श्री. अमोल विकासराव डुबे (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती) श्री. तुषारजी देशमुख (सदस्य) श्री. जीवनराव गडगूळ (सदस्य), सौ.शोभा  भंडारी मॅडम (सदस्य)  श्री.राजेश  साखरे( परिक्षक) श्री. गिरीश ठाकुर (प्राचार्य सी.बी.एस.ई) श्री. एन. एस. राव (प्राचार्य स्टेट)  सर्व विभाग प्रमुख आणि संकुलातील शिक्षक वृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .नामदेव सर व सौ. पुनम मॅडम यांनी प्रास्ताविक श्री.मुलगीर सर तर आभार प्रदर्शन श्री.सचिन जाधव सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम प्रमुख  यांनी विशेष परिश्रम घेतले व  पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असे भेल संस्कार केंद्राचे प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रफुल्ल कांबळे सर व श्री. परीक्षित पाटील सर यांनी प्रसिद्धी माध्यमास दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या