Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्हाधिकारी यांच्या सोबत पिकविमा,दुष्काळ यासह विविध प्रश्नावर किसान सभाची बैठक

आपला ई पेपर/बीड / प्रतिनिधी


बलिप्रतिपदेच्या दिवशी कर्जाचे पुनर्गठन नाही तर सरसकट कर्जमाफी करावी यासह दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना तात्काळ लागू करा पिक विमा वितरित करा या मागणीला घेऊन किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर किर्तन आंदोलन झाले होते यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार आज शुक्रवार (दि.24) रोजी किसान सभेच्या शिष्टमंडळात सोबत बैठक संपन्न झाली.यावेळी सोयाबीन पीकविमा अग्रीम सर्व समावेशक पद्धतीने वितरित झाला नाही याविषयी चर्चा झाली.

विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील जवळपास सात लाख शेतकऱ्यांना पिकविमा अग्रीम वितरित झाल्याचे सांगितले मात्र किसान सभेच्या कॉ.एड.अजय बुरांडे यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार अर्ध्या शेतकऱ्यांना सुद्धा अग्रीमचे पैसे मिळाले नसल्याची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली.

जिल्हाधिकारी मॅडम यांनी यासंदर्भात  विमा प्रतिनिधींना खुलासा विचारला असता आम्ही हा सर्व पैसा केंद्राच्या वितरण प्रणालीत जमा केला असून तो किती जणाला मिळाला हे सांगता येत नसल्याचे मान्य केले व पुढील एक महिन्यात उर्वरित 1 लाख  18 हजार शेतकऱ्यांच्या प्रस्तावांची पडताळणी पूर्ण करून उर्वरित लोकांचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर  जमा करण्यात येईल असे सांगितले तसेच या याद्या एक महिन्याच्या आत गटविकास अधिकारी स्तरावर उपलब्ध करून देऊन कृषी सहाय्यकामार्फत ग्रामपंचायत स्तरापर्यंत पोहोचवण्यात येतील असे सांगितले.इतर दीर्घ मुदतीच्या पिकांचा पिक विमा पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवालानंतर वस्तुस्थिती लक्षात घेऊन मिळेल असे सांगितले. बँक प्रतिनिधीशी चर्चा करत असताना खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यावर लावण्यात आलेले  होल्ड संबंधित सूचना दिल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.


वीज वितरण संदर्भात सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली तसेच शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न हा गंभीर आहे असेही निदर्शनात आणून देण्यात आले.

दुष्काळात जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई लक्षात घेता पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होणार आहे असेही बैठकीत शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले  यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी गाळपेऱ्याला बियाण्याचे सहाय्य करण्यात येईल असे सांगितले. तसेच दुष्काळ जाहीर झालेल्या अंबाजोगाई,वडवणी,धारूर या तालुक्याना मिळणाऱ्या दुष्काळी उपाय योजना संपूर्ण जिल्ह्यात लागू करा ही मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने लावून धरली.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री.स्वामी जिल्हा अग्रनी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा कृषीअधीक्षक, वीमा कंपनी प्रतिनिधी,जिल्हा पशुसंवर्धन अधीक्षक, महावितरण अभियंता हे अधिकारी उपस्थित होते 

यावेळी या शिष्टमंडळात किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष कॉ.एड.अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ.मुरलीधर नागरगोजे,कार्याध्यक्ष कॉ. काशीराम सिरसाट, कॉ. दत्ता डाके, कॉ.भगवान बडे, कॉ.ब्रम्हाणंद देशमुख, कॉ.कृष्णा सोळंके, कॉ.संजय चोले, कॉ.दादासाहेब सिरसाट, कॉ.राजेभाऊ बादाडे, कॉ.सावळाराम उबाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या