Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत शक्तीकुंज वसाहतीमध्ये आनंदोत्सव साजरा ..

 


परळी औष्णिक विद्युत केंद्राचा ५२ वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन-मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये


आपला ई पेपर परळी प्रतिनिधी


येथील औष्णिक विद्युत केंद्राचा ५२व्या वर्धापन दिनानिमित्त दि १५ नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभास अध्यक्षस्थानी महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ पी अनबलगन (भा.प्र.से.)  तर प्रमुख अतिथी संचालक  संजय मरुडकर,संचालक अभय हरणे, संचालक बाळासाहेब थिटे, विशेष निमंत्रित कार्यकारी संचालक राजेश पाटील, पंकज सपाटे, नितीन चांदुरकर, नितीन वाघ, पी एम नागदेवते या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. 


परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या 52 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून,खास कर्मचारी ,अधिकारी व कुटुंबीयांसाठी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविले गेले.

या मध्ये क्रीडा प्रकारात क्रिकेट,कुस्ती,व्हॉलीबॉल, बास्केटबॉल,बॅडमिंटन,टेबल टेनिस, कॅरम,चेस,धावणे, लांब उडी, थाळी फेक,भाला फेक, महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी

सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यांमध्ये हॅप्पी स्ट्रीट वॉक,मार्केट बिल्डिंग पासून मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .

त्यानंतर  हॅप्पी कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये विविध ग्रामीण, पुरोगामी खेळांचे, खानपानाचे, मेहंदी, झुला, घोडेस्वारी, बैल बंडीचे, ईटी दांडू इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते .

शक्तीकुंज वसाहतीमधील विद्यार्थी तसेच नागरिकांनी  मेळाव्यात सामील होऊन आनंदोत्सवाच्या कार्यक्रमाचा  आनंद घेतला.द टॅलेंट शोचे आयोजनखुले रंगमंच, शक्तीकूंज वसाहत येथे करण्यात आले होते.

 सांस्कृतिक समिती आणि अश्वमेध नाट्य संघ आयोजित रॅम्प वॉक मध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला.

द टॅलेंट शो अंतर्गतगायन/वादन,नृत्य,अभिनय/वेशभूषा, स्पेशल टॅलेंट याचबरोबर,चित्र काढणे आणि चित्र रंगवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अनेकांनी या स्पर्धेत आपले नैपुण्य सिद्ध केले.

खुले रंगमंच येथे दि १२ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमात (लहान मुलांचे डान्स) सादर करण्यात आले.तसेच आनंद मेळावा व आर्केस्ट्रा (गीत गायनाचा ) आधी कार्यक्रम दि २ ते ११ नोव्हेंबर दरम्यान कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी अधिक्षक उपमुख्य अभियंता अमित बनकर, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, अभियंता एस एन बुकतारे, राजीव रेड्डी, धनंजय कोकाटे, प्रसन्न कुमार गरुड,वरिष्ठ व्यवस्थापक वित्ते व लेखा अरविंद येळे,  धनंजय कोकाटे, कार्यकारी अभियंता सुरेश गर्जे, सौ काठोये मॅडम, सौ मनीषा अवचार, के एच गित्ते  मॅडम, सुनीता मोहिते,कार्यकारी अभियंता मदन पवार, प्रभारी कार्यकारी अभियंता हेमंत यादव,कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ सतीश मुंडे, व्यवस्थापक एम एन जाधव, व्यवस्थापक सुनील पवार, श्रीगणेश मुंडे ,कामगार नेते हरिराम गित्ते, सुरक्षितता अधिकारी एस बी उदार, तुकाराम पाटील, वैजनाथ चाटे, प्रदीप चव्हाण, उपकार्यकारी अभियंता शाहू येवते, चैतन्य जाधव, राजू गाजले, के एच गित्ते  मॅडम ,महेश होनमाने आदींची उपस्थिती होती.उपस्थितांचे आभार सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड यांनी मानले.

*हेही वाचा थेट..मोबाईलवर वाचा संपूर्ण दिवाळी अंक2023*

दैनिक मराठवाडा साथीच्या दिपावली विशेषांक2023*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_94.html*

*दै.मराठवाडा साथीच्या दिवाळी अंकाचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज प्रकाशन*
🔴👇👇👇
*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*

*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या