Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी भूषण, शिक्षणमहर्षी कै. विठ्ठलराव तांदळे सर यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानकुंभ सप्ताह ठरला कलागुणांचा अविष्कार..

 


परळी भूषण कै विठ्ठलराव तांदळे सर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ज्ञानकुंभ सप्ताह अंतर्गत स्पर्धाचे आज बक्षीस वितरण सोहळा


प्रसिद्ध कलावंत शुभम बोराडे ( कलर्स मराठी ढोलकीच्या तालावरती प्रथम उपविजेते ) यांची प्रमुख उपस्थिती

आपला ई पेपर |परळी |प्रतिनिधी आज (दि 09) ऑक्टोबर सोमवार रोजी शहरातील  संस्कार प्राथमिक शाळा, पद्मावती विभागात पद्मावती शिक्षण संस्थेचे संस्थापक, आदर्श शिक्षक, परळी भूषण, शिक्षणमहर्षी कै. विठ्ठलराव तांदळे सर यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानकुंभ सप्ताह सोहळा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलावंत, कलर मराठी आयोजित ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमातील उपविजेता, आपल्या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र श्री शुभम बोराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

        प्रसिद्ध कलावंत शुभम बोराडे हा अस्सल लावण्या सादर करतो प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवली आहे. बीडचा असणारा शुभम बोराडे  हा एक प्रोफेशनल डान्सर आहे  प्रशिक्षित लावणी नृत्य सादर करतो. प्रसिद्ध कलावंत शुभम बोराडे यांची कलेची प्रेरणा नक्कीच विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या ज्ञानकुंभ सप्ताह  अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण सुप्रसिद्ध कलावंत शुभम बोराडे  यांच्या शुभहस्ते होणार आहे. या ज्ञान कुंभ सप्ताहाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या वेग - वेगळ्या स्पर्धेतून  विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार स्पर्धेतून निर्माण होईल व ही प्रेरणा विद्यार्थ्यांच्या भविष्यकाळातील नक्कीच फायदेशीर ठरेल व विद्यार्थी सर्व गुण संपन्न बनेल.

      ज्ञानकुंभ सप्ताह अंतर्गत आयोजित या कार्यक्रमासाठी पद्मावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्र.मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या