Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत हुबेहूब तुळजभवानीच्या मंदिराचा सजीव देखावा ठरणार आकर्षण


नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सव २०२३

|आपला ई पेपर | परळी |प्रतिनिधी

कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेले नाथ प्रतिष्ठान व राधा - मोहन साठी प्रतिष्ठान दरवर्षी दुर्गोत्सव थाटात साजरा करण्यात येतो. यंदा आयोजित दुर्गोत्सव २०२३ मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानीची हुबेहुब मूर्तीची प्रतिकृती स्थापन करण्यात येत आहे. अतिशय भव्य असा हा देखाव्यात ज्यामध्ये तटबंदी किल्ल्याची प्रतिकृती असणार आहे. 

 त्याबरोबरच दैनंदिन पूजाअर्चा ज्याप्रमाणे तुळजापूर येथील मंदिरात होते त्याप्रमाणे सर्व पूजा इथेही दैनंदिन होतील. संबळ, पोतराज, परडी, मशालीची पोत अशा प्रकारे तुळजापूर येथील मंदिर प्रमाणे सजीव देखावा भव्य स्वरूपात उभारण्यात येणार आहे. २५ बाय ४० चा नवरात्री अखंड ज्योती कक्षाची निर्मिती करण्यात येणार असून २११ अखंड ज्योती अहोरात्र ९ दिवस विविध याजमनानंकडून स्थापित केल्या जातील. 

नाथ प्रतिष्ठान व राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. नाथ रोडवरील औद्योगिक वसाहत सभागृह येथे तुळजभवानीच्या मंदिराचा भव्य देखावा राकेश चांडक यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत आहे. दि.१५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता देवीची स्थापना करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या