आपला ई पेपर |परळी|धीरज जंगले
ज्याचा कोणी वाली नसतो त्याचा वाली देवरूपी डॉक्टर असतात.असेच एक डॉक्टर म्हणजे परळी येथील 108 रुग्णवाहिकेचे डॉ.अमोल चाटे होय. पायाला जखमा होऊन प्रचंड वेदना अक्षरशःपायात आळ्या झालेला एक निराधार रुग्ण वैद्यनाथ मंदिर परिसरात दिसून आला. ही माहिती डॉ.अमोल चाटे यांना मिळताच कर्तव्यदक्ष डॉ. चाटे व त्यांच्या टीमने स्वतः त्या रुग्णास उचलून 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातूनपरळी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले आहे.
निराधार रुग्ण वैद्यनाथ मंदिर परिसरात वेदनेने त्रस्त अशा अवस्थेत पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत कांबळे यांना मिळताच त्यांनी सदरील रुग्णांची माहिती 108 रुग्णवाहिकेचे अविरत धनी डॉ.अमोल चाटे यांना दूरध्वनीद्वारे दिली.सदरील माहिती प्राप्त होताच वैद्यनाथ मंदिर परिसरात रुग्णवाहिका घेऊन डॉक्टर अमोल चाटे व त्यांचे सहकारी तात्काळ दाखल झाले.
बेवारस पीडित रुग्ण तडफडत होता. त्याची हाक प्रभू वैद्यनाथाने ऐकली. रुग्णसेवेचा वसा घेतलेले डॉ.अमोल चाटे यांनी निराधार व्यक्ती पीडित व्यक्ती याची पाहणी केली असता दोन्ही पायाला जखमा, मध्ये आळ्या पडलेल्या दिसून आल्या. डॉ अमोल चाटे व पायलट धीरज साखरे यांनी त्या व्यक्तीला पाहिलं समोर बघ्याची, बघणाऱ्यांची गर्दी जास्त होती.
मदतीला कोणी येत नव्हतं. स्वतःहा डॉ चाटे, कांबळे यांनी रुग्णाला ऍम्ब्युलन्स मध्ये बसवलं तात्काळ उपचार चालू करून परळीतलं उपजिल्हा रुग्णालय गाठलं, रुग्णालाला प्राथमिक उपचार करून ताबडतोब अंबेजोगाईला डॉ. अमोल चाटे हे घेवून गेले.डॉक्टरातील माणुसकीचे दर्शन आज या घटनेने सर्वांना दिसून आले.
Social Plugin