Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून वैद्यनाथ ज्योतीर्लिंगाचा विकास होणार |चंदुलाल बियाणी


आपला ई पेपर|परळी | प्रतिनिधी 

परळीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्याचे कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून २८६ कोटी रुपये मिळणार आहेत. यामुळे वैद्यनाथ ज्योतीर्लिंगाचा विकास होणार आहे. त्याचा परिणाम भाविकांची संख्या वाढुन परळीच्या बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढणार असल्याचे मत प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केले आहे.

       मुंबई येथे सोमवारी (ता.९) मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या २८६.६८ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. 

देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी 

२८६.६८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मंदिरात दगडी भिंती बांधून जीर्णोद्धार करणे, यात्री प्रतीक्षालय यासह विविध एकूण 92 कामे करावयाची आहेत . त्यामुळे ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी बीड यांनी या कामाचा सुधारित आराखडा मान्यतेस्तव सादर केला होता.ना. धनंजय मुंडे यांच्या या प्रयत्नांना मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुर्त रुप आले आहे. परळीच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या ना. धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ मंदिराच्या विकासासाठी आणलेला निधी मोठा आहे. त्यामुळे मंदिर व परिसराचा विकास होणार आहे. त्याबद्दल प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी ना.धनंजय मुंडे यांचे अभिनंदन करुण आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या