Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राज्यातील कंत्राटी नोकर भरती बंद करा.. शाळांच्या खाजगीकरणा निषेधार्थ परळीत उपोषण


आपला ई पेपर |परळी |प्रतिनिधी|


राज्यातील सर्व शासकीय,निमशासकीय, आदि सरकारी नोकऱ्यां मधील कंत्राटी भरती पद्धत कायमस्वरूपी बंद करावी तसेच राज्यातील सर्वसामान्य, बहुजनांच्या पाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सरकारी शाळा उद्योजकांना चालवण्यास देण्यात येऊ नयेत या प्रमुख मागणीसाठी जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड हे  17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी परळी उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

    याबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या राज्य शासनाच्या कंत्राटी नोकर भरती प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. यापुढे राज्य शासनाच्या वतीने दिले जाणाऱ्या सर्व नोकऱ्या या कंत्राटी पद्धतीने न देता कायमस्वरूपी जागा भरण्यात याव्यात.नोकर भरती प्रक्रियेचे काम कोणत्याही खाजगी संस्थांना देऊ नये.

     याबरोबरच महाराष्ट्रातील 60 हजार सरकारी शाळा चालवण्यासाठी उद्योजकांना देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब पालकांच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे. सध्या शिक्षण प्रचंड महाग झाले असून खाजगी शाळांमधून प्रचंड फी आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य शासनाने सरकारी शाळा जर उद्योजकांना चालवण्यात दिल्या तर सर्वसामान्य पालकांचे व विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण होईल.

   राज्यातील यापुढे कंत्राटी नोकर भरती कायमस्वरूपी बंद करावी, तसेच सरकारी एकही शाळा चालवण्यासाठी उद्योजकांना देण्यात येऊ नये या मागण्यांसाठी 17 सप्टेंबर रोजी रानबा गायकवाड परळी उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या उपोषणास सामाजिक संस्था, शिक्षण प्रेमी, व सुशिक्षित बेरोजगारांनी पाठिंबा देण्याचे आवाहन रानबा गायकवाड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या