Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत क्रिडासंकुलाला २० कोटी रु निधी; क्रिडाप्रेमींनी मानले कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आभार

 


आपला ई पेपर | परळी वैजनाथ

       छत्रपती संभाजीनगर येथे सपंन्न झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये  विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला , त्यात परळी क्रीडा संकुल उभारण्यासाठी २० कोटी रु निधी जाहीर झाला 

मागच्या अनेक वर्षापासून क्रीडा प्रेमी, क्रीडा  शिक्षक , खेळाडू  यांची परळी साठी क्रीडांगण असावे ही मागणी होती.  

       परळीचे भाग्यविधाते विकासपुरुष  धनंजय मुंडे  यांनी हा विषय मनात घेऊन मागच्याच वेळी क्रीडा संकुल साठी जागेची पाहणी करण्यासंबंधी सूचना ही केल्या.आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर निधीही मंजूर करून घेतला व परळी क्रीडा प्रेमींना खूप मोठी भेट दिली. 

           मंजूर निधीचे काम लवकरात लवकर सुरू होऊन भव्य असे क्रीडांगण लवकरच उभे राहून  खेळाडूंना योग्य न्याय मिळेल या घोषणे मध्ये क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात आला. असून  ना. धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत .

         राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे  अध्यक्ष अजय जोशी , नवनिर्वाचित क्रिडाध्यक्ष शिवाजी मुंडे शहराध्यक्ष विलास अरगडे, परळी तालुका क्रीडास्पर्धा संयोजक संजय देशमुख क्रीडा शिक्षक बालू हंगरगे , विजय मुंडे , अतुल दुबे , मदन कराड , यशवंत कांबळे , जगदीश कावरे , ओम मेंकुडले , सय्यद अनवर, संजय शेप , प्रा सुनील चव्हाण , रामकृष्ण गडदे रमेश गित्ते व क्रीडा शिक्षक संघटना यांनी  ना.धनंजय मुंडे  यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या