Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिक्षणा बरोबरच बुद्धिबळ सारखे खेळ हे सुद्धा यशासाठी महत्त्वाचे आहेत|प्राचार्य मंगेश काशीद

आपला ई पेपर |परळी |प्रतिनिधी


परळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे
बीड जिल्हा क्रीडा विभाग व परळी गटसाधन केंद्र व परळी तालुका क्रीडा विभाग यांचा संयुक्त विद्यमाने 
परळीत राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे  आज दि 12 रोजी सकाळी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळेतील 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, तसेच जिल्हा क्रीडा शिक्षक संघटना यांच्या वतीने घेण्यात येत आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोदार लर्न
स्कूलचे प्राचार्य मंगेश काशिद, राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते विजयकुमार तपके, बुद्धिबळ तज्ञ सुशांत दहिफळे, विजय मुंडे, मदन कराड, विशाल पौळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

राजस्थानीज पोदार स्कूल येथे आज झालेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत  14, 17 व 19 वर्षांखालील वयोगटातील 120 मुले-मुलीनी सहभाग घेतला होता.तालुक्यातील सर्व माध्यमिक, प्राथमिक शाळानी आपल्या शाळेतील खेळाडू स्पर्धेमध्ये उतरवून स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य केले अशी माहिती परळी तालुका क्रिडा प्रमुख तथा कार्यक्रमाच्या संयोजक संजय उर्फ पापा देशमुख सर यांनी दिली.


या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांनी खेळा सोबत आरोग्याकडे लक्ष द्यावे या प्रेरणेतून प्रोत्साहन मिळावे म्हणून पोदार शाळेचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग, प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहेत

लवकरच पोदार स्कूलच्या मैदानावर साकारणार क्रिकेटपटूंसाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसह क्रिकेटचा सराव क्रिकेट प्रीमियम साठी जागा उपलब्ध करून देणार तसेच परळी तालुक्यात खेळाडूंसाठी प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा खेळातून आरोग्य जपावे या उद्देशाने या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पोदार शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.

यावेळी या खेळाचे पंच म्हणून परळी तालुक्यातील क्रीडा शिक्षक यशवंत कांबळे, विलास आरगडे, चंद्रकांत चाटे, सूर्यकांत घोलप, सिताराम कराड, सुशील कटके, संघमित्रा मॅडम ,सिताराम गुट्टे, सुनील तारे राहुल गुठ्ठे आदींनी पंच म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अजय जोशी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास आरगडे सर यांनी मानले.

या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे अशी माहिती तालुका क्रीडाशिक्षक कार्यक्रमाची संयोजक संजय देशमुख यांनी दिली आहे

आज झालेल्या परळी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धाचा निकाल14वर्षे मुलांचा गट

 विजेते

1)भन्साळी समर्थ पंकज(फाउंडेशन स्कूल परळी)

2)बरदाळे शिवम दिनेश(फाउंडेशन स्कूल परळी)

3)राठोड आदित्य माणिक(नवीन माध्यमिक परळी

 4)मोदानीआरूष आशिष (फाउंडेशन स्कूल परळी)

5) फडआयुष महादेव (दिल्ली पब्लिक स्कूल परळी)


परळी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धाचा निकाल14वर्षे मुलीचा गट 

विजेते 

1)तोष्णीवाल कोमल महेशकुमार (भेल सेकंडरी स्कूल परळी)

2) भावठणकर श्रनिधी सचिन  

(राजस्थानी पोदार स्कूल परळी)

3) चाटे श्रावणी संतोष (भेल सेकंडरी स्कूल परळी)

4) रुद्रवार ईश्वरी श्रीनिल (राजस्थानी पोदार लर्न स्कूल परळी)

5)गित्ते स्नेहा सुधीर (विद्यावर्धिनी  विद्यालय परळी)


परळी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धाचा निकाल 17 वर्ष मुलींचा गट 

विजेते     

1) अदिती अमोल कुलकर्णी (भेल सेकंडरी स्कूल परळी)

2)वीरश्री शशीशेखर चौधरी (भेल सेकंडरी स्कूल)

3)श्रीजा अंकुशराव जबदे (फौंडेशन स्कूल परळी)

4) सेजल पवन  मोदानी (भेल सेकंडरी स्कूल परळी)

5)सेजल चंद्रकांत गायकवाड  (दिल्ली पब्लिक स्कूल)

परळी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धाचा निकाल 17 वर्ष मुलांचा गट 

विजेते            

1)अर्णव राजेश जाजू (राजस्थानीज पोदार स्कूल)  

2)व्यंकटेश सुशेन दहिफळे  (विद्यावर्धिनी विद्यालय)            

3)रोहन कैलास डुमणे (विद्यावर्धिनी विद्यालय)    

4) दिग्विजय शिवशंकर महाजन (भेल सेंकंडरी स्कुल)    

5)विश्वजीत प्रकाश चव्हाण   (भेंल सेकंडरी स्कुल)

परळी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धाचा निकाल 19 वर्ष मुलींचा गट 

विजेते

1) गायत्री तुळशीदास प्रयाग (विद्यावर्धिनी विद्यालय परळी

2) उत्कर्षा विष्णू तिडके (विद्यावर्धिनी विद्यालय परळी)

3) प्रगती श्रावण अदमाणे (न्यू हायस्कूल परळी)



उर्वरित खेळांचे वेळापत्रक

दि.12/9/2023 वार मंगळवार बुद्धीबळ
दि.13/9/2023 वार बुधवार फूटबॉल
दि.15 व 16 /9/2023 शुक्रवार व शनिवार
दि.18/9/2023 वार सोमवार व्हॉलीबॉल
दि20 व 21/9/2023 वार बुधवार व गुरुवार खोखो व कबड्डी
व क्रिकेट या स्पर्धेची तारीख कळवली जाईल..संपर्क  संजय उर्फ पापा देशमुख सर  98228 33554


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या