Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|PARli|रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने| स्वागत अध्यक्ष चंदुलाल बियाणी


परळी-विकाराबाद दुहेरीकरण सर्वेक्षणासाठी ५कोटी ३५लाख मंजुर

आपला ई पेपर |PARli|

परळी वै रेल्वे प्रशासनाने नुकत्याच काढलेल्या पत्रकानुसार परळी-विकाराबाद या २६७.७७ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरण फायनल लोकेशन सर्वेक्षणसाठी दिल्ली बोर्डाने मान्यता दिली आहे. परळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी रेल्वे प्रशासनाचे स्वागत केले आहे.

परळी ते विकाराबाद या लोहमार्गावर प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढत आहे. हा मार्ग दक्षिण भारताला जोडणारा दुवा आहे. शिवाय मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रवासी रेल्वेंना अडथळा निर्माण होतो. 

त्यामुळेच  परळी-विकाराबाद या २६७.७७ किमी रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरण फायनल लोकेशन सर्वेक्षणासाठी दिल्ली रेल्वे बोर्डाने मान्यता दिली आहे. विद्युतीकरणाचा शिल्लक राहिलेला अंतिम टप्पा आणि दुहेरीकरणाला मिळालेली मंजुरी या भागातील सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे या लोहमार्गावरील प्रवास अधिक गतिमान, पर्यावरणपूरक, इंधन व वेळेची बचत करणारा ठरणार आहे. परळी - विकाराबाद मार्गाच्या सर्वेक्षणासाठी ५ कोटी ३५ लाख रुपये मंजुर झाले आहेत.

रेल्वे विकासात ही मंजुरी महत्त्वपूर्ण आहे.

परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने समितीच्या स्थापनेपासून भविष्यात परळी रेल्वे स्थानकास महत्व असणार आहे. याबद्दल रेल्वे प्रशासनाचे रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व सचिव जी एस सौंदळे यांनी स्वागत केले  आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या