Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी रेल्वे संघर्ष समितीकडून केंद्र शासनाचे आभार |चंदुलाल बियाणी

अमृत भारत योजने अंतर्गत परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट..

आपला ई पेपर |Parli|


परळी केंद्र शासनाच्या अमृत भारत योजनेच्या अंतर्गत देशभरातील शेकडो रेल्वे स्थानकांचा चेहरा मोहरा बदण्यात येणार असून, शासनाकडून पुनर्विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. उद्घाटन कार्यक्रमाचा रेल्वे प्रशासनाकडून आढावाही घेण्यात आला आहे. दि.६ ऑगस्ट रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतीर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचाही या योजनेत समावेशत करण्यात आला आहे. याबद्दल रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने केंद्र शासनाचे आभार मानण्यात आले आहेत.

रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी म्हटले आहे की, स्व.मोहनलालजी बियाणी कृती समितीचे अध्यक्ष असतांना परळीच्या रेल्वे स्थानकातील सुधारणांबाबत अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या माध्यमातून परळीचे शिष्टमंडळ दिल्लीला जावून तत्कालीन रेल्वे मंत्र्यांना भेटले होते. विद्यमान खासदार डॉ.प्रितमताई मुंडे व महाराष्ट्राचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातूनही अनेकवेळा विविध मागण्यांचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे करण्यात आला आहे. केंद्र शासनाने अमृत योजनेत परळीच्या रेल्वे स्थानकाचा समावेश केल्यामुळे रेल्वे संघर्ष समितीकडून केंद्र शासनाचे तसेच खा.डॉ.प्रितमताई मुंडे व कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करण्यात आल्याचे चंदुलाल बियाणी यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या