Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ना.धो.महानोर यांचे निधन |मृदू मनाच्या निसर्ग कवीला साहित्य विश्व मुकले | चंदुलाल बियाणी


ज्येष्ठ कवी,साहित्यिक ना. धो.महानोर यांचे निधन

आपला ई पेपर


परळी ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज गुरुवारी सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. मृत्युसमयी ते ८१ वर्षांचे होते. ना.धो.महानोर हे ग्रामीण जीवनाचा वेध घेणारे मृदू मनाचे कवी होते. त्यांच्या साहित्यातून ग्रामीण जीवन आणि निसर्गाच्या विविध छटा जगासोमार मांडल्या गेल्या. अशा या सर्जनशील साहित्यिकाच्या जाण्याने साहित्य विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ना.धो.महानोर यांच्या व्यक्तिमत्वाची पोकळी भरून निघणे अशक्य असल्याच्या शोकभावना परळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केल्या.



ज्येष्ठ साहित्यिक ना.धो.महानोर यांच्या अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्र लोकप्रिय ठरले. यासह गपसप, गावातल्या गोष्टी हे कथासंग्रहदेखील वाचकांच्या पसंतीस उतरले. १६ सप्टेंबर १९४२ मध्ये जन्मलेल्या ना.धो. महानोर यांची साहित्यसंपदा मोठी आहे. आपल्या साहित्यात काहीवेळा बोलीभाषांचा वापर केला. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतरचना केली. लोकभाषेवरील त्यांचे प्रेम विलक्षण होते. त्यामुळेच त्यांच्या साहित्याने वाचक, श्रोत्यांच्या मनावर बराच काळ अधिराज्य गाजवले व ते कायम असेलही. अशा थोर ज्येष्ठ साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचे काळाच्या पडद्याआड जाणे ही साहित्य विश्वासाठी धक्कादायक बातमी आहे असे मसापचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी मत व्यक्त करून शोकभावना प्रकट केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या