आपला ई पेपर
परळी प्रतिनिधी
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिम आज यशस्वी झाली. या गौरवशाली क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांकडून शहरांत मिरवणूक काढून राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. यावेळी पेढे भरवत शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने झाली.
सायंकाळी सहाच्या सुमारास विक्रम लँडर चंद्रावर सुखरूप उतरल्याचे इस्रोने जाहीर केले त्यांनंतर राणी लक्ष्मीबाई टॉवर समोर चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल नागरिकांनी आज ढोल ताशांच्या गजरात नाचून आनंदोत्सव साजरा केला.
(Advt.)
इस्रोचे चेयरमन एस सोमनाथ व त्यांच्या शास्त्रज्ञ सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन ही मोहीम यशस्वी केली त्यामुळे त्या सर्वांचे अभिनंदन करत त्यांचा जयघोष केला गेला. जब तक सूरज चांद रहेगा हिंदुस्थान तेरा नाम रहेगा, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परळी शहर दुमदुमून गेले.




Social Plugin