Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI | श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळ्यास उत्साहात सुरुवात


संतसंगतीने जीवनाला वेगळीच दिशा हभप नारायण महाराज बारटक्के

आपला ई पेपर |

PARLI |संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा निमित्त परळी वैजनाथ येथे कृष्णा नगर भागात श्री संत नामदेव महाराज मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. असून ज्ञानेश्वरी पारायण व व्यासपीठ प्रमुख ह भ प श्री नारायण महाराज बारटक्के हे असून सोहळ्याची आजच्या दिवशी ते म्हणाले की, ज्ञानेश्वरी ग्रंथात सांगितलेल्या ज्ञानाचा आत्मसात केल्यास मनुष्याच्या जीवनात सुख,शांती व समृद्धी लाभणार आहे.


संतसंगतीने जीवनाला वेगळीच दिशा मिळते,असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री नारायण महाराज बारटक्के यांनी केले . 

Parli | कृष्णा नगर येथील संत नामदेव महाराज मंदिरात दररोज पहाटे चार ते सहा काकडा, सात ते अकरा श्री ज्ञानेश्वरी पारायण, दहा ते बारा गाथा भजन, दुपारी दोन ते चार श्री संत नामदेव चरित्र, चार ते सहा महिला भजनी मंडळ व धुपारती, रात्री आठ ते दहा हरीजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.दिनांक 9 जुलै पासून सुरू असून  दिनांक 15 जुलै रोजी  श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता होणार सकाळी दहा ते बारा वाजता गीता भक्त ह भ प श्री संपत महाराज गीते यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर पालखी मिरवणूक व सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच 16 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 वाजता ह भ प श्री ह भ प श्री नारायण महाराज बारटक्के यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

 तसेच 17 जुलै सोमवार रोजी प्रक्षाळ पूजा होईल व श्री संत नामदेव महाराज महिला भजनी मंडळाचे भजन होणार आहे.

Parli  |शहर व पंचक्रोशीतील भावी भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज, श्री संत नामदेव महाराज महिला मंडळ, श्री संत नामदेव महाराज युवक मंडळ परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या