Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मोदी सरकारने देशहितासाठी ऐतिहासिक योगदान दिले प्रा पवन मुंडे

  #@9 मोदी सरकारने देशहितासाठी....


परळी प्रतिनिधी 

परळी शहरातील प्रभाग 14 मध्ये "मोदी @9 जनसंपर्क अभियान उत्साहात संपन्न झाले,मा. ना. लोकनेत्या पंकजाताई मुंडे व लोकप्रिय खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक प्रा पवन मुंडे प्रभागातील विविध भागांत जाऊन मागील 9 वर्षात केंद्रातील


भाजपाच्या मोदी सरकारने केलेल्या लोककल्यानी विविध विकास कामांचा लेखा जोखा जनतेसमोर मांडला,या मध्ये राम मंदिर निर्माण,मोफत रेशन मिळवून देणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय योजना,घरकुल  योजना,उज्वला गॅस योजना,महिला सक्षमीकरण
योजना,या सहित देशात निर्माण झालेले नवीन महामार्ग,मेट्रो मार्ग अशा देशातील प्रगतीच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोचवली.

मोदी सरकारने देशहितासाठी ऐतिहासिक योगदान दिल्याचे मत या वेळी माजी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी व्यक्त केले,

या प्रसंगी नागरिकांशी संवाद साधला असता लोक मोदी सरकारच्या कार्याविषयी समाधानी दिसून आले, या वेळी महिला कार्यकर्त्या चंदाताई ठोंबरे यांच्या समवेत प्रभागातील भाजपाच्या अनेक महिला व तरुण पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या