Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक | कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ...

 


 | आपला ई पेपर |

     अंबाजोगाई जवळच असलेल्या  शहरातून मांडवा पठाणकडे जाणाऱ्या रोडच्या लगत आज गुरुवारी दि.०४दुपारी दरीत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील मृतदेह पुरुषाचा आहे की महिलेचा हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. मात्र, मृतदेहाजवळ साडी आणि चप्पल आढळून आल्याने हा मृतदेह महिलेचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


     मृतदेहाची अवस्था पाहून अंदाजे १५ ते २० दिवसापूर्वी सदरील व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. दरम्यान, माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस तपासातून या घटनेचे गूढ उलगडणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या