Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सावधान ! 2000 रु च्या बनावट नोटा देऊन गंडा घातल्याने शेतकरी दांम्पत्यास अश्रू अनावर...

 



बीड / प्रतिनिधी 

डोंगरगण येथील एका शेतकर्‍याची पाठ बोकड विकत घेऊन बनावट 2000 रु ची नोटा देत फसवणूक करून दोघे फरार झाल्याची घटना मंगळवारी सकाळीच्या सुमारास घडली.

शेळ्याचे व्यापारी म्हणून आले अन् बनावट नोटा देऊन गंडा घालून गेल्याचा प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 


आष्टी तालुक्यातील कडा देवळाली रोडवरील डोंगरगण येथील नबाजी  भाऊ घोडके हे शेळी पालन करतात.त्यांचाकडे सहा शेळ्या आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान दोघे दुचाकीवरून घोडके यांच्या घरी आले. व्यापारी असल्याचे सांगून दोघांनी पाठ बोकड विकत घेण्यासाठी बोलणी केली. दोन्हीसाठी साडे नऊ हजार रुपयात व्यवहार झाला.

 *🎯आजचा पेपर वाचला का...*

*मोबाईलवर वाचा संपूर्ण पेपर*

*🎯दैनिक मराठवाडा साथी*

*🎯बातमी एका क्लिकवर डाउनलोड करा. तसेच सोशल मीडियावर शेअर करा...*
👇👇👇
*वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*👇👇👇

*http://epaper.marathwadasathi.com/*

🎯*संतोष बारटक्के*      *9423472426*

🎯दैनिक मराठवाडा साथी न्यूज*



दोघांनी घोडके यांच्या पत्नी कुसुम यांच्याकडे घरात जाऊन पैसे दिले. पत्नीकडून पैसे घेताच घोडके यांना २ हजार रुपयांच्या चार, तर पाचशेच्या ३ नोटा बनावट आढळून आल्या. सर्व साडेनऊ हजारांच्या नोटा बनावट निघून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत पाठ बोकड घेऊन दुचाकीवरून दोघांनी पाबोरा केला होता. 


बनावट नोटा देऊन गंडा घातल्याने शेतकरी दांम्पत्यास अश्रू आवरले नाही. अंभोरा पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या