Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटले...

 

108 हुतात्म्यापैकी एक हुतात्म्याचा फाईल फोटो

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटले...

आपला ई पेपर /मुंबई 

राज्यातील एकही गाव किंवा जमिनीचा तुकडाही कर्नाटकात जाऊ नये, यासाठी राज्याने जोरदार प्रयत्न सुरू केल्याने सीमावादाची लढाई अशुभच ठरण्याची चिन्हे आहेत. सोलापूरमधील 28गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्यावर तोडगाही निघाला आहे.एवढेच नाही तर बोम्मई जिंदाबादच्या घोषणाही या गावातील ग्रामस्थांनी दिल्या. त्यामुळे खळबळ उडाली आहे.



महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटले आहेत.सोलापूर जिल्ह्यातील २८गावे कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत. जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय घेतल्यानंतर ग्रामस्थांनी बोम्मई सरकारचा विजय असो की कर्नाटकचा विजय असो अशा घोषणा दिल्या आहेत. 



या मागणीसाठी तडवळसह 28 गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आपल्याला नियमित रस्ते,पाणी, वीज,एसटी सेवा मिळत नाही. त्यामुळे हताश होऊन आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी कर्नाटकात सामील होण्याबाबत बोललो,त्यांना फॅक्स पाठवला. कर्नाटकात सामील झाल्यानंतर सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले.



यापूर्वी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्या मतदारसंघात होतो.मात्र मुख्यमंत्री असतानाही त्यांनी आमच्या गावांचा विकास केलेला नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही 28 ते 30 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. 



त्याचीही राज्यकर्त्यांनी दखल घेतली नाही.लोकप्रतिनिधी, प्रशासन आमच्याकडे लक्ष देणार नाही, तर आम्ही राज्यात का राहणार? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.महिलेला प्रसूतीसाठी नेत असताना रस्त्यातच तिची प्रसूती झाली.एखाद्या रुग्णाला शहरात घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू होतो,रस्ते इतके खराब आहेत.त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाण्यास इच्छुक आहोत.याबाबत 28 गावांनी ठराव घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.


*ब्रेकिंग न्यूज-माझा*

*आपला ई पेपर-Online*

*https://aplaepaper.blogspot.com*

*हेडलाईन्स न्यूज *
*आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime | News Live Marathi | News | Murder | Rape | Accident | Theft | Suicide News*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या