Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुःखद निधन |शिंपी समाजातील प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्र प्रभाकर धोकटे यांचे निधन

 


शिंपी समाजातील प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्र प्रभाकर धोकटे यांचे निधन

परळी मोंढा भागातील रहिवाशी राजेंद्र प्रभाकर धोकटे यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 65 वर्षे वयाचे होते. राजेंद्र धोकटे यांच्या आकस्मिक निधनाने मित्र परिवारामध्ये सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

शिंपी समाजातील राजेंद्र प्रभाकर धोकटे हे परळी शहरात मोंढा मार्केट परिसरातील महालक्ष्मी कलेक्शनचे  प्रतिष्ठित व्यापारी म्हणून सर्व परिचित व्यक्तिमत्व होते. विविध धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यात ते नेहमी सक्रिय होते. 

शिंपी समाजातील विलास धोकटे यांचे ते बंधू होते आज पुणे येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

आज अंत्यसंस्कार...

परळी येथील मुक्तीधाम मध्ये आज दि.3 शनिवारी रोजी संध्याकाळी 6;30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा मोंढा मार्केट येथील त्यांचे राहते घर येथून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा दोन मुली भाऊ,भावजई असा मोठा परिवार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या