Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

चक्क |परळीत चालू विद्युत मिटर चोराने चोरून नेले |पोलिसात गुन्हा दाखल



चक्क परळीत विद्युत मिटर चोराने चोरून नेले |पोलिसात गुन्हा दाखल

परळीच्या गणेशपार भागात एका प्रतिष्ठित वकिलाच्या घराबाहेर भिंतीला लावलेले विद्युत मिटर चक्क चोराने चोरी केल्याचा आज रोजी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

परळी पोलिसात दाखल झालेल्या माहितीनुसार गणेशपार भागातील रहिवाशी असलेल्या अॕड.शशीशेखर सुरेश चौधरी यांच्या घराबाहेर असलेले वीज महावितरण कंपनीचे वापरातील  वीज मीटर क्र ५८९०६०५४xxxx अज्ञात चोरट्याने भिंतीवरुन  काढून चोरी केल्ची घटना नुकतीच घडली आहे.

या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अड.शशी शेखर चौधरी यांच्या तक्रारीवरून गुरनं २०३ / २०२२ कलम ३७९ भादवि अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी व तपास

पोह वळवी हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या