Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या कारणामुळे |परळीत एकाचा मृत्यू |बेशिस्त वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष का?



चिरीमिरीसाठी गोरगरिबांचा जिवावर उठलेल्या यावाहतूक पोलिसांवर कारवाई कोण करणार..

काल नुकताच एका अज्ञात व्यक्तीचा या बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तरीसुद्धा आजही या बेशिस्त वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

चार दोन रुपयाच्या चिरीमिरीवर गोरगरिबांचा जिवावर उठलेल्या या वाहतूक पोलिसांवर कारवाई कोण करणार असाही सवाल नागरिकांनी केला आहे.


 परळी शहरातील  छत्रपती शिवाजी  चौक ते उड्डाणपूलावर रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहने ट्रक ऑटो उभे करून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या वाहन चालकावर कारवाई कोण करणार.. परळी पोलिस ही बेशिस्त वाहतूक कधी सुरळीत करणार....


सध्या परळी शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे.वाहन चालक नियमाचे उल्लंघन करून शहरातील मौलाना अब्दुल कलाम  चौक, शिवाजी चौक, बस स्टँड जुन्या कोर्ट समोरील हॉटेल च्या समोर असलेले वाहने ऑटो रिक्षा, ट्रक समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूने बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. यामुळे दुकानासमोरील वाहने पार्क करताना व्यवस्थित न केल्यामुळे व्यापाऱ्यांनीही त्रास होत आहे.


परळी पोलिसांनी ही बेशिस्त वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी आज  रोजी सामाजिक कार्यकर्ते नी एका निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
आपली पोस्ट पहिली, एक जागरूक नागरिक पत्रकार म्हणून आपण समाजाचे प्रश्न मांडत आहात, यासाठी आपले हार्दिक अभिनंदन, आपल्या पोस्ट मध्ये आपण सांगितले आहे कि बे शिस्त वाहतूकीमुळे एकाचा मृत्यू, याकडे वाहतूक पोलीस यांचे दुर्लक्ष का? हा आपला प्रश्न विचारणे अगदी योग्य, पण आपल्या प्रश्नाचे उत्तर हे आपल्या प्रश्नात आहे, आपण नागरिक म्हणून वाहतूक पोलीस यांनी सांगितलेले नियम पाळतो का? परळीत मुख्य रस्त्यावर मागील काही वर्षांपासून सिग्नल बसवलेले आहेत त्या नुसार आपण नागरिक म्हणून खरेच सिग्नल पाहून त्या पद्धतीने वाहतूक करतो का? जर आपण नागरिक म्हणून आपल्या असलेल्या जबाबदारी पाळत नसणार तर असे समोरील वाहतूक पोलीस यंत्रणा यांना प्रश्न काय म्हणून विचारत आहोत, सर्वात आगोदर आपण सर्वांनी वाहतूकीचे नियम पाळले पाहिजे म्हणजे असे होणारे अपघात होणार नाहीत आणि सर्वाना शिस्त लागेल जय महाराष्ट्र