Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अष्टविनायक दर्शन |परळीत एकाच मंडपात 8 प्रसिद्ध गणेश मंदीराचा.. साक्षात्कार

 अष्टविनायक दर्शन |परळीत एकाच मंडपात 8 प्रसिद्ध गणेश मंदीराचा.. साक्षात्कार 



मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचा उपक्रम

माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार देखाव्याचे उद्‌घाटन

परळी येथे दै.मराठवाडा  साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे 2022 चा गणेशोत्सव उत्साहपुर्ण, भक्तीपुर्ण व तेवढ्याच पारंपारिक पद्धतीने विविध देखाव्यांसह साजरा करण्यात येणार आहे. 

यावर्षी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकांची 8 मंदीरे, हुबेहुब मुर्ती, गुरुकुल व आधुनिक शिक्षण पद्धती असे देखावे सादर करण्यात येत आहेत. 

देखावा प्रसिद्ध नेपथ्यकार राकेश चांडक साकारत असून 10 हजार स्क्वेअर फुटावर हा देखावा तयार होत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे

अगदी प्रवेशद्वारापासून बाहेर पडण्याच्या मार्गापर्यंत अशी नेत्रदिपक सजावट करण्यात येत आहे. यावर्षीच्या गणेशोत्सावात हा देखावा निश्चितच लक्षवेधी ठरेल यात शंका नाही.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील 2 वर्ष श्री गणेशोत्सवास अनेक अडथळे निर्माण झाले होते. विघ्नहर्ता श्री गणेशाचे आता 31 ऑगस्ट रोजी आगमन होत असून श्रीं च्या आशिर्वादाने कोरोनाचे निर्बंधही आता शंभर टक्के शिथील झाले आहेत. राज्यभरात यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत धुमधडाक्यात होत असून मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानने या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी केली आहे. 

मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सजावट व देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेले परळी येथील राकेश चांडक व त्यांची शंभर जणांची टीम यावर्षी देखाव्याच्या तयारीसाठी कामाला लागली आहे. 

अष्टविनायक दर्शन ही यावर्षीची गणेशोत्सव देखाव्याची थीम असून एकाच मंडपात राज्यातील सर्व म्हणजे 8 प्रसिद्ध गणेश मंदीरे साकारली जात असून येथे  हुबेहुब मुर्तीसह गुरुकुल-आधुनिक शिक्षण पद्धतीने हा आगळा-वेगळा देखावाही सादर केला जात आहे.

एकाच मंडपात अष्टविनायक

राज्यात प्रसिद्ध असलेल्या व अष्टविनायक म्हणून ओळख असलेल्या श्री गणेश मंदीराचा देखावा यावेळी सादर केला जात आहे. 

वैद्यनाथ औद्योगीक वसाहतीच्या सभागृहात 10 हजार स्क्वेअर फुटावर हा देखावा साकारला जात असून या ठिकाणी श्री गणपतीच्या मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महळ आणि पाली येथील अष्टविनायकांचे चित्र दालन तयार केले जात आहे. प्रत्येक गणपतीची हुबेहुब मुर्ती, स्वतंत्र मंदीर, पाण्याचा भव-दिव्य कारंजा, आधुनिक आणि प्राचिन गुरुकुल शिक्षण पद्धती हा देखावा यावेळी मांडला जात आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक दर्शनाची मोठी महती असून प्रत्येकाला अष्टविनायकाचे दर्शन करावे वाटते, आम्ही ही सर्व मंदीरे एकाच ठिकाणी तयार करीत असून प्रत्येक श्रीगणेश भक्ताला परळीतच अष्टविनायकांचे मनोभावे दर्शन करता यावे हा यामागे उद्देश असल्याचे मार्गदर्शक तथा मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले.

राजस्थानी कला कुसर

वैद्यनाथ औद्योगीक सभागृहात तयार होत असलेल्या अष्टविनायक दर्शन देखाव्यासाठी राजस्थानी कला कुसर वापरली जात आहे. प्रत्येक मंदीरासाठी, त्याच्या अवती-भोवती असलेल्या पर्णकुटीसाठी राजस्थान येथील सरकंडे या गवत वर्गातील साहित्य वापरली जात आहे. राजस्थान आणि हरियाणा या दोन राज्यातच केवळ पाली हे गवत उत्पादन होत असून सरकंड्यापासून झोपडी म्हणजेच श्रीं साठीची  पर्णकुटी तयार केली जात आहे. प्रत्येक मंदीराच्या दोन्ही बाजूला पंचधान्य लावण्यात आले असून ते आता वाढले आहे. हा देखावा अधिक चांगला व्हावा आणि दर्शन घेतांना आपण अष्टविनायक मंदीरातच आहोत असा भाव निर्माण व्हावा, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत असल्याचे सजावटकार राकेश चांडक यांनी सांगीतले.

आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते देखाव्याचा शुभारंभ

मराठवाडा साथी आणि राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात येणाऱ्या अष्टविनायक दर्शन सोहळ्याचे उद्‌घाटन 31 ऑगस्ट रोजी सायं.5 वा. औद्योगीक वसाहत सभागृहात होत आहे. सायं.5 वा. माजी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते देखाव्याचा शुभारंभ करण्यात येणार असून याचवेळी नवरात्रीनिमित्त नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने माँ वैष्णोदेवीचा हुबेहुब व डोंगर, कपार तसेच वरुन पडणारा बर्फ असा देखावा सादर करण्यात येणार आहे. त्याचे भुमिपूजन याच कार्यक्रमात माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. सदरच्या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या