नागपूर येथे एका मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील अकरा वर्षे चिमुकल्या मुलीवर
शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने मुलीला घरी बोलावून अगोदर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. यानंतर पुन्हा दीड महिन्यापर्यंत इतर साथीदारांना बोलावूनही मुलीवर अत्याचार सुरूच होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.
त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना पाठवून या माहितीची चौकशी करून 10 नराधमांना अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी रोशन कारगावकर वय 29 हा मुलीच्या घराशेजारी राहतो. त्याची या चिमुरडीवर वाईट नजर होती.
रोशनची परिसरात एक लहान चष्म्याचे दुकान आहे. त्यालाही काही दिवसांपूर्वी उमरेड पोलिसांनी कलम ३०२ अंतर्गत खुनाच्या गुन्ह्यात अटक केली होती.
हत्येच्या घटनेच्या तपासा दरम्यान पोलिसांना रोशनच्या याकृत्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा छडा लागला आहे.
हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या रोशनची पोलीस चौकशी करत होते. याच दरम्यान त्याने घराशेजारी राहणाऱ्या एका मुलीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मात्र हा प्रकार दीड महिन्यापासून सुरू असल्याने पोलिसात तक्रार न आल्याने पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांच्या वेशात घटनेचा तपास करण्यासाठी पाठवले. त्यानंतर पोलीस तपासात या नराधमासोबत अन्य 9 जणांनीही या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
ही माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. त्यानंतर बुधवारी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींशिवाय आणखी 9 जणांना अटक केली. सध्या सर्व आरोपींना 30 जुलैपर्यंत PCR देण्यात आला आहे.
Social Plugin