Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड येथे पुरवठा विभागाचे बिंग अखेर फुटले | कोट्यवधींचा घोटाळा | परळीत घोटाळाचे कनेक्शन घडकीस |


BEED येथे काळ्या बाजारात विक्री साठी हैदराबाद कडे रवाना करणाऱ्या पुरवठा विभागाचे बिंग अखेर फुटले  दुकानाचे कार्ड ऑनलाईन झाले नाही हे कारण पुढे करत जिल्हाभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य कमी देण्याचे प्रकार सुरू होते
अखेर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी स्वतः छापा टाकून गोडाऊन ची झाडाझडती सुरू केली आहे, कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस येणार आज जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी अचानक बीड मधील धान्य गोडाऊन वर छापा टाकला संपूर्ण चौकशी सुरू केली गेल्या चार तासापासून जिल्हाधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत,बीड जिल्ह्यात धान्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात होतो,
असल्याने घोटाळेबाजाचे धाबे दणाणले आहे.बीड जिल्ह्यात धान्य घोटाळ्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून बिनदिक्कत पणे सुरू आहे, अनेकदा हा घोटाळा उघडकीस आला, थातुर माथुर कारवाई झाली, निलंबन झाले ,ज्याच्यावर कारवाई झाली ते पुन्हा सेवेत रुजू झाले अन घोट्याळया ला पाय फुटले हे कायमचेच आहे आता पुन्हा एकदा कोट्यावधीचा घोटाळा उघडकीस येत आहे,
 परळी रेल्वे स्टेशनवरून बहुतांश धान्य काळ्या बाजारात रवाना होते, काळ्या बाजारात जाणारे तेवढे धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना खाते ऑनलाइन झाले नसल्याचे कारण पुढे करत कमी द्यायचे तब्बल पन्नास टक्के धान्य प्रत्येक दुकानदारांना कमी द्यायचे , पुन्हा उरलेला माल गोडाऊन मध्ये येऊन पडला की प्रत्येक पोत्यातून दोन ते अडीच किलो धान्य रात्रीच्या वेळी काढून घ्यायचे, त्या पेक्षा भयंकर बाब या गोडाऊन मध्ये असणारा वजन काटा च दोषयुक्त असल्याचे समोर येत आहे तब्बल एक ते दीड किलो वजन कमी असल्याचे समोर येत आहे,
बीड जिल्ह्यातील दर महिन्याला कोट्यवधींचा घोटाळा करणारे भ्रष्ट हात कोणाचे आहेत हे शोधून काढणे महत्वाचे आहे, केवळ गोडाऊन किप्पर की वरिष्ठ अधिकाऱ्याचे हात यात गुंतले आहे हे शोधण्याचे काम जिल्हाधिकारी यांना करावे लागणार आहे
x