Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सर्व ग्रुपअॅडमीनने सुचना ; महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ नुसार नोटीस आहे


परळी // उद्या १ एप्रिल २०२० रोजी बरेच लोक आपले मित्र परिवार, हित संबंधितांना ,नातेवाईकांना " एप्रिल फुल " करीत असतात. परंतु सध्यस्थितीत आपल्यावर असणारे कोरोना व्हायरसचे संकट तसेच संचारबंदी यामुळे आपण कोरोना व्हायरसच्या संदर्भाने कोणत्याही प्रकारचे लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करतील अश्या प्रकारचे मेसेज टाकु नयेत. सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यास व्हायरल करणाऱ्यास व त्या ग्रुप अॅडमिनला, मी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ नुसार प्रतिबंध करीत आहे. असे कृत्य केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४० तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील.सोशल मिडीयावर व्हायरल करु नये. जेणेकरुन लोकांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होवुन संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही. प्रशासनावर ताण निर्माण होणार नाही. सर्व सुज्ञ नागरीक आहात आपण असे करणार नाही अशी आपल्याकडुन अपेक्षा आहे. जर अशा स्वरुपाचे मेसेज आपल्याकडुन  ग्रुप अॅडमीनने आत्ताच आपल्या ग्रुपवर सर्व सदस्यांना सुचना दयाव्यात.तसेच सेटिंग मध्ये जावुन फक्त ग्रुप अॅडमिन मेसेज सेंड करेल असे सेटिंग करावे.