बीड// बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती प्रेरणा देशभ्रतार (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बहुचर्चित प्रेरणा देशभ्रतार यांचा महापालिकेच्या वर्तुळात दबदबा होता एक शिस्तप्रिय तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्या परिचित होत्या तसेच बेकायदा गोष्टी रोखण्यासाठी कुठलाही आणि कुणाशीही वाद ओढवून घेण्याची त्यांची तयारी असायची त्यात त्या कधी मागे हटले नाही.
बीडचे जिल्हाधिकारी अस्तीक कुमार पांडे (भाप्रसे) यांची औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी अस्तीक कुमार पांडे यांना बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार हा औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांच्या सल्ल्यानुसार अन्य अधिकार्याकडे सोपविण्याचा आदेश देण्यात आला असून त्यांना तात्काळ औरंगाबादच्या मनपा आयुक्ताचा पदभार स्विकारण्यास सांगण्यात आले आहे. पांडे यांची औरंगाबादचे मनपा आयुक्त निपुण विनायक (भाप्रसे) यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.आज (बुधवार) औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आणि बीडच्या जिल्हाधिकार्यांची बदली करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश अप्पर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी काढले आहेत.


Social Plugin