Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य माध्यमिक चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचा शेगाव येथे रविवार दिनांक 22 डिसेंबर 2019 रोजी राज्यव्यापी मेळावा


शेगाव // महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यातील खाजगी अनुदानित विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत हा मेळावा शेगाव येथे रविवार दिनांक 22 डिसेंबर 2019 रोजी दुपारी १.०० वाजता महात्मा फुले माध्यमिक विद्यालय शेगाव येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात राज्यभरातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या संघटनात्मक बांधणी संदर्भात तसेच न्याय मागण्यांच्या लढ्याला मूर्त रूप देऊन एक शाश्वत विचारांची संघटना तयार करण्याचा मनोदय राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचारी बांधवांनी व्यक्त केला आहेत

 यात  न्याय मागण्यासाठी सर्व चतुर्थश्रेणी कर्मचारी एकवटले असून या मेळाव्यात विविध मागण्यासंदर्भात चर्चा करून शासनदरबारी त्या संदर्भा चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात येऊन न्याय्य मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे 

अनुकंप भरती चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या 25 टक्के 50 टक्के नदीचे करण्यात यावे

 अनुकंपा पद प्रतिष्ठा तात्काळ मान्यता देण्यात यावी,  
२०१३-१४ ते २०१८-१९ संचमान्यता दुरुस्त करून त्यात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश करून त्या प्रत्येक शाळांना देण्यात याव्यात व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदाला संरक्षण मिळावे , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे , चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना रात्रपाळी ची ड्युटी देण्यात येऊ नये , राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीमुळे तसेच वेतन कुंठित वसुलीच्या कार्यवाहीला बंदी घालण्यात येऊन वेतन दुरूस्ती करण्यात येऊन ४४४०-७४४० ऐवजी ५२००_२०२०० वेतनश्रेणी लागू करून वेतन निश्चिती करण्यात यावी,  शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षकांना जसा मतदानाचा अधिकार आहेत तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना देखील मतदानाचा अधिकार मिळावा,  अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी,सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात यावे , शालेय स्तरावरील विविध समित्यांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रतिनिधित्व मिळावे,  राज्यभरातील प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो त्याच धर्तीवर जिल्हा स्तरावर आदर्श चतुर्थश्रेणी कर्मचारी पुरस्कार देखील देण्यात यावा,  यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये निधी मंजूर करण्यात यावा, आकृतिबंधाच्या संदर्भातील सकारात्मक निर्णय घेऊन तात्काळ चिपळूणकर आयोगाप्रमाणे पदभरती करण्यात यावे, कामाचे घड्याळी ५० तास नेमून दिलेले आहेत त्या अनुषंगाने काम करत आहे  परंतु चतुर्थश्रेणी कर्मचारी हा २४ तास शालेय प्रशासन व संस्थेच्या कामात गुंतलेला असतो त्यास विशेष सवलत रजा म्हणून दीपावलीच्या सुट्टीत पाच दिवस सवलत रजा मिळावे, वर्ग ३ व ४  ची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना धुलाई व शिलाई भत्ता वेतनातून देण्यात यावा,ह्या आणि अशा विविध मागण्यांसंदर्भात विचारमंथन होऊन संघटन बांधणीला मूर्तरूप देण्याचा मनोदय व्यक्त करण्यात येणार असून यासाठी मोठ्या संख्येने राज्यभरातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन रंगासिंग मालवीय,  राजेंद्र घुबे ,भाऊसाहेब बोराडे, संदीप शिंदे ,सुनील सोनवणे, नंदू पाटील इजाज शेख, संतोष बारटक्के, ज्ञानेश्वर मुळे, सूर्यवंशी, संगीता शिंदे, तानाजी पाटील उदय धकाते, सुरेश बोधी , रमाकांत जोशी आदी पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.