Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणा-या आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी_

अंबाजोगाईतील बलात्काराच्या घटनेची पंकजाताई मुंडे यांनी केली तीव्र निंदा


अंबाजोगाई // येथे एका शिक्षकाने विद्यार्थीनीवर केलेल्या बलात्काराच्या घटनेची गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी तीव्र शब्दांत निंदा केली असून खेदही व्यक्त केला आहे. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणा-या सदर शिक्षकांस कठोर शासन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

   नववी इयत्तेत शिक्षण घेणा-या एका विद्यार्थ्यांनीवर शाळेतीलच एका क्रीडा शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली, यासंदर्भात पोलिसात दिलेल्या तक्रारी नंतर संबंधित शिक्षकाला अटक करून गुन्हाही दाखल झाला आहे तथापि अंबाजोगाई सारख्या सुसंस्कृत शहरात घडलेल्या हया घृणास्पद प्रकाराने प्रचंड संताप व्यक्त होत आहे, या घटनेची मी तीव्र निंदा व खेद व्यक्त करते. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी असेही त्यांनी म्हटले आहे.