परळी //शहरातील स्नेह नगर भागात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील धुणीभांडी करणारी महिला वर ज्यांच्या घरची धुणीभांडी करत होती त्यांच्या घरात चोरी झाल्याने त्या चोरीचा संशय त्या धुणीभांडी करणाऱ्या महिलेवर घेत तूच चोरी केली म्हणतात आरोप केला तो आरोप धुणीभांडी करणाऱ्या झोपडपट्टी एरियातील महिलेला सहन न झाल्याने तिने आज विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली असून याबाबत घटनेतील सत्यता व अधिक तपास परळी पोलिस करत आहेत दुपार पर्यंत गुन्हा नोंद अशी प्राथमिक माहिती मिळाली असून सदर प्रकरणात छबूबाई नारायण पाचमासे वय 50 रा.परळी या मयताच्या नातेवाईकांनी मयत महिला वर आरोप करणाऱ्या कुटुंबावर गुन्हा नोंद करून अटक करण्याची मागणी करत महिलेचा मृतदेह परळी पोलीस स्टेशनच्या परिसरात आणून ठेवत मागणी केल्याचे समजते चोरीचा आरोप घेणाऱ्या वर गुन्हा दाखल करा असे मयत महिलाचे नातेवाईक करीत आहेत व महिलाचा मृतदेह ॲम्बुलन्स मध्ये टाकून पोलीस स्टेशनच्या समोर आणून ठेवला आहे
Social Plugin