परळी // प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करून देणारा ईद-ए-मिलादचा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. सर्वांना ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा देत.या मिरवणुकीची सुरुवात मलीकपूरा येथून मान्यवर उपस्थित झाली . सकाळी साडे आठ वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त आज रविवारी रोजी जुलूस कमिटच्यावतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत मुस्लिम तरुण, चिमुकल्यांनी डोक्यावर हिरवा फेटा, पांढरे, काळे रंगाचे पठाणी वस्त्र परिधान करून हातात हिरवा झेंडा, कपाळावर हिरव्या रंगाची पट्टी, गालावर चंद्रकोरच्या टॅट कोरले होते. अशा विविध प्रकारचे वेशभूषा परिधान करून मुस्लिम बांधव मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यासर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद व उत्साह दिसून येत होता.
Social Plugin