Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी-अंबाजोगाई- पिंपळा धायगुडा हा राष्ट्रीय महामार्ग अर्धवट रस्ता पुर्ण होणार की नाही ?


परळी //परळी-पिंपळा धायगुडा दरम्यानच्या 18.5 कि.मीच्या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाला आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत परळी-अंबाजोगाई या रस्त्याचा मुद्दा प्रचारात होता.हे काम रखडल्याने पंकजा मुंडे यांना याचा मोठा फटका बसला होता.आता या महामार्गाचे पुढील काम करण्याची जबाबदारी नवनिर्वाचित आ.धनंजय मुंडे व खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्यावर येवुन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वी सुरु करण्यात आलेले काम पुन्हा बंद पडले आहे.निवडणुक संपताच गुत्तेदाराने रस्ता कामावरील मशीन हलविल्या आहेत.यामुळे नागरिकांना प्रश्न पडला आहे अर्धवट रस्ता पुर्ण होणार की नाही ?

परळी-अंबाजोगाई दरम्यानच्या पिंपळा धायगुडा हा राष्ट्रीय महामार्ग  प्रवाशासाठी नेहमीच डोकेदुःखी बनला आहे.दोन वर्षापासुन उखडुन ठेवलेल्या या रस्त्याचे चारवेळा काम सुरु होवुन पुन्हा बंद पडले आहे. 20 मिनिटाच्या या प्रवासासाठी दीड तास लागत आहे.

दोन वर्षापुर्वी सुनिल हायटेक या कंपनीस कामाचे टेंडर सुटल्यानंतर एका बाजुने रस्ता करण्याऐवजी हा 18.5 कि.मी.चा संपुर्ण रस्ता उखडुन टाकला व त्यानंतर कामाची गती मंदावल्याने अनेकांनी या रस्त्याच्या कामाबाबात तक्रारी केलेल्या मागील एक वर्षात वेगवेगळ्या सब कॉन्ट्रॅक्टदारांनी रस्त्याचे काम सुरु केले व कामे पुर्ण न करताच बिले उचलुन पुन्हा बंद केल्याने उन्हाळाभर नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत होता.या रस्त्याचे काम त्वरीत सुरु करावे या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी दि.10 मार्च रोजी लोकप्रतिनिधींच्या विरोधात रास्ता रोको करत महिला,मुला-बाळासह आंदोलन केले होते.लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने या आंदोलनास खा.प्रितम मुंडे व धनंजय मुंडे यांनी भेटी दिल्यानंतर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.यानंतर या रस्त्याचे काम लागलीच सुरु करण्यात आले परंतु पावसाळा सुरु होताच पुन्हा बंद पडले.विधानसभेचे बिगुल वाजताच नविन गुत्तेदारामार्फत हे काम पुन्हा सुरु करण्यात आले परंतु या निवडणुकीचा निकाल लागताच गुत्तेदाराने कामावरील मशिन हलविल्याने या रस्त्याचे काम पुन्हा बंद पडले आहे
यामुळे नागरिकांना प्रश्न पडला आहे अर्धवट रस्ता पुर्ण होणार की नाही ?