Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

उड्डाण पुलाजवळ मोटारसायकल व टिप्परचा अपघात ; एक ठार तर दोन जखमी .



परळी // टोकवाडी येथे लग्नाचा कार्यक्रम उरकून मोटारसायकल वर येणाऱ्या   तरुणाचा थर्मलजवळील जुन्या उड्डाण पुलाजवळ मोटारसायकल व राख वाहणाऱ्या टिप्परचा अपघात होऊन यामध्ये एक ठार तर दोन जखमी झाले आहेत. 

परळीटोकवाडी येथे लग्नाचा कार्यक्रम उरकून
मोटारसायकल (एम.एच.२४-एझेड
६७४१) वर शिवराज सत्तु गित्ते (वय४०
रा.नंदागौळ), शिवाजी बाबुराव गित्ते
(वय ३३), नितीन पंढरी गिते (वय
३०) हे तिघे येत असताना थर्मलजवळील जुन्या उड्डाणपुलावर राख वाहन नेणाऱ्या टिप्परचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये शिवराज सत्तू गित्ते याचा मृत्यू झाला. तर शिवाजी
गित्ते, नितीन गित्ते हे जखमी झाले असून
त्यांना उपचारासाठी येथील रूग्णालयात
भरती केले आहे. सदरील या प्रकरणी
दुपारपर्यंत कसलाही गुन्हा दाखल
करण्याची प्रक्रिया सुरू नव्हती.अपघाताचे वाढत्या घटनेवर नियंत्रण  का होत नाही.. परळी शहरातील वाढती अवैध वाहतुक आणि यावर शहर व इतर पोलिस ठाण्याचे पोलिसांचे दुर्लक्ष का? अशी चर्चा आहे . दरम्यान,
राख वाहून नेणाऱ्या टिप्परमधून नेहमीच
राखेची गळती होत असल्यामुळे असे
अपघात होत असल्याचे बोलले जात
आहे. यावर पत्रकार, सर्वसामान्य व
सामाजिक संघटनेनेही आवाज उठवला परंतु काही कारवाई नाही .