असा मुख्यमंत्री पाहिजे जनतेला आणि प्रशासन कसा चालवायचं असतं ते बाकीच्या राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांनी पहावे ओन्ली अरविंद केजरीवाल दिल्ली मुख्यमंत्री.....हा video .किल्क करा..!!
मुंबई // उद्धव ठाकरे महत्त्वाची खाती स्वीकारून मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दोन अतिरिक्त मंत्रिपदं (एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री) दिली जावीत. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जावी.नव्या प्रस्तावात मागणी नुसार मुख्यमंत्रिपद भाजपाकडे राहील. मात्र मंत्रिमंडळात शिवसेनेला समान वाटा देऊ, असं आश्वासन नव्या प्रस्तावात देण्यात आलं आहे. त्यामुळे याशिवाय राज्यातील सहकार क्षेत्रातल्या संस्थांमध्ये शिवसेनेचं 50 टक्के नियंत्रण असावं असेही म्हटलं आहे .
मुख्यमंत्र्यांना राज्यात सरकार कधी स्थापन होणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'लवकरच' असं उत्तर त्यांनी दिलं. निवडणुकीच्या निकालाला 9 दिवस उलटल्यानंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी उद्धव यांना नवा प्रस्ताव पाठवल्याचं समजतं आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याची माहिती आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटू शकतो.


Social Plugin