सुप्रीम कोर्टात शनिवारी याचिका नंतर रविवारी, सोमवारी आणि आज (मंगळवार) सुनावणी झाली. आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. सुप्रीम कोर्टानं उद्या (बुधवार) सायंकाळी 5 वाजेपर्यंत भाजपाला बहुमत सिध्द करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला. अखेर अजित पवार यांनी राजकीय परिस्थिती ओळखून तसेच कुटूंबाचे महत्व लक्षात घेवुन उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. ही माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर दुसरीकडे ...
@आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राजीनामा देतील असं सांगितलं जात आहे.
@शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री पद स्विकारण्यास तयार झाल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.
सद्यपरिस्थिती काय?
सद्यपरिस्थितीत अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. अजित पवार यांनी मी अजूनही राष्ट्रवादीत असल्याचा दावा सुप्रीम कोर्टात केला आहे. मात्र, आपल्याला राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं ते अद्याप दाखवू शकले नाहीत.
@आमदारांची मतदानावेळी अनुपस्थिती
विरोधी पक्षांचे काही आमदार बहुमत चाचणीवेळी सभागृहात अनुपस्थित राहिले तर बहुमतासाठी आवश्यक असणारे संख्याबळ कमी होईल आणि भाजपाला बहुमत सिद्ध करता येईल. २८८ सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपकडे १०५ सदस्य आहेत. अशावेळी भाजप १०५+१३+इतरांच्या मदतीनं बहुमत सिद्ध करू शकतो.

Social Plugin