Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे पंतप्रधानांनी घेतले दर्शन .


परळी वैजनाथ // परळीत सभेसाठी आलेल्या पंतप्रधानांनी सभेपूर्वी वैद्यनाथ मंदिर येथे जाऊन बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे घेतले दर्शन .  यावेळी पालकमंत्री ना. पंकजा मुंडे या त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज गुरुवारी परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयच्या समोरील मैदानावर जाहीर सभा झाली . या सभेसाठी विराट जनसमुदाय जमा झाला. मंत्री पंकजा मुंडे, खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर संपूर्ण ताफा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत  बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिर येथे रवाना झाला.    

वैद्यनाथ मंदिर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यनाथाचे विधीवत पुजन करुन घेतले दर्शन घेतले. त्यानंतर सभास्थळी त्यांचे आगमन होउन विराट जनसमुदायाला संबोधित केलेे.