बीड// आज परळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या नियोजनासाठी बीड येथून आलेल्या दंगल प्रतिबंधक गाडीचा परतताना सिरसाळा येथे नुकताच अपघात झाला असून या गाडीचे चालक गंभीर जखमी झाले तर इतर 10 ते 15 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना बीड येथे उपचारासाठी आणण्यात येत आहे.
चालक अशोक बन्शी कदम, जीवन गगांवणे, आकाश यादव, भयासाहेब निर्सगंध, अमोल राउत असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर बाकी जखमींना माजलगाव येथील प्राथमिक रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे.
परळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या सुरक्षेसाठी बीड येथून दंगल प्रतिबंधक दलाचे एक पथक गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा संपल्यानंतर दंगल प्रतिबंधक दलाचे पथक बीडकडे परत होते. सिरसाळा येथे पोलिसांची व्हॅन आली असता चालकाचे गाडीवरील निंयत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटली. यामध्ये दहा ते पंधरा पोलीस जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत



Social Plugin