Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विजयादशमी उत्सव निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले परळीकरांचे लक्ष


परळी // राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी शहरात पथसंचलन करण्यात आले.रविवारी शहरातील औद्योगिक वसाहत सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ शाखेतर्फे करण्यात आले होते.
विजयादशमी उत्सवानिमित्त शहरात पवित्र भगव्या ध्वजासह पथसंचलन करण्यात आले.हे पथसंचलन औद्योगिक वसाहत येथून सुरू होऊन,छत्रपती शिवाजी चौक,बस स्टँड,अग्रवाल लॉज,स्टेशन रोड,बाजार समिती,आय.डी.बी.आय.बँक,स्टेट बँके समोरून पुढे औद्योगिक वसाहतीत संचलनाचा समारोप करण्यात आला.संचलन मार्गावर पवित्र भगव्या ध्वजावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्यवृष्टी केली,या संचलनासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पथसंचलनानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मनोज मुंडे,डॉ.सुभाष जोशी (देवगिरी प्रांत संपर्क प्रमुख) यांची उपस्थिती होती,यावेळी प्रमुख पाहुण्यांचे भाषण संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी प्रा.उत्तम कांदे(जिल्हा संघचालक),डॉ.अजित केंद्रे(तालुका संघचालक),केशव लांडगे यांच्यासह स्वयंसेवक,राष्ट्रप्रेमींची उपस्थिती होती.उपस्थित स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला वंदना करुन हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला.