नेवासा// आज दुपारी दीडच्या सुमारास जिल्हा न्यायालयातील सुप्रसिद्ध अॅड. संभाजी ताके आणि त्यांच्यासह अशा दोघांची नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती गाव येथे निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना घडली. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मयत वकिलाच्या पुतण्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अॅड. ताके हे पत्नी आणि दोन मुलांसह भिंगार शहरानजीक असलेल्या नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील सौरभनगर कॉलनी येथे राहतात. अॅड. ताके यांचे जेऊर हैबती हे मूळ आहे. ते आज गावाकडे काही कामानिमित्त गेले होते. तेथे त्यांच्या जमिनीचे वादातून घडली आहे.
अॅड. ताके यांच्याबरोबर असलेल्या सहकार्याची ओळख अजून पटलेली नाही. कुर्हाडीने त्यांच्यावर हल्ला झाला असून, घटनास्थळी डस्टर मोटारगाडी आढळल्याचे नेवासे पोलिसांनी सांगितले. तसेच एकास ताब्यांत घेतल्याचे देखील समजते. घटनास्थळाचा पंचनामा नेवासे पोलिसांकडून सुरू आहे. अॅड. ताके यांच्या हत्येची माहिती नेवासा तालुक्यात वार्यासारखी पसरल्याने खळबळ उडाली आहे.
Social Plugin