मुंबई // निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या तारखा आज जाहिर केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात निवडणूका होणार असून मतदान हे 21 ऑक्टोबरला तर मतमोजणी ही 24 ऑक्टोबरला रोजी होणार आहे. महाराष्ट्रासह हरियाणामध्ये देखील विधानसभा निवडणूका होणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये 8.94 कोटी मतदार आहेत तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहे. दोन्ही राज्यात मिळून विधानसभेच्या 378 सीट आहेत. त्यापैकी 288 जागा महाराष्ट्रात तर 90 जागा हरियाणात आहेत.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे –
1. उमेदवारांना 28 लाखापर्यंत खर्च करण्याची मुभा
2. प्रत्येक उमेदवारांना अग्नीशस्त्रे जमा करणे बंधनकारक
3. उमेदवारांनी प्रचारात प्लास्टिकचा उपयोग न करण्याचं आवाहन
4. सोशल मिडीयावर निवडणूक आयोगाची नजर
5. विविध राज्यात 64 ठिकाणी पोटनिवडणूक
सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणूकीची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. त्यातच महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत अनेक ठिकाणी चुरसीच्या लढती होणार आहेत. भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात यावेळी थेट लढत नसणार आहे. वंचित आघाडीनं देखील 288 जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढती होण्याची दाट शक्यता आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी २८८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम केला जाहीर.
अधिसूचना – २७ सप्टेंबर
नामनिर्देशन पत्र अंतिम मुदत- ४ ऑक्टोबर
छाननी – ५ ऑक्टोबर
माघार- ७ ऑक्टोबर
मतदान- २१ ऑक्टोबर
मतमोजणी- २४ ऑक्टोबर
Social Plugin